‘श्रीवर्धन’मध्ये १३ जागांसाठी दि. 28 रोजी मुलाखती

तुळजापूर : काटी शिवारातील श्रीवर्धन अँग्रो प्रा. लि. (श्रीवर्धन शुगर्स) यांच्या गूळ पावडर कारखान्यात विविध ११ पदांसाठी एकूण १३ जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांसाठी सोमवार, २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता कारखान्याच्या पत्त्यावर प्रत्यक्ष मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.
ज्यूस सुपरवायझर, क्वाड्रिपल मेट, डॉरमेट, ऑलिव्हर मेट, पॅन इन्चार्ज, पॅनमन, टर्बाइन अटेंडंट, ऑईलमन, बॉयलर अटेंडंट, फायरमन आणि वॉटरमन या पदांचा समावेश आहे. जाहिरातीनुसार उमेदवारांकडे पदानुसार बारावी, आयटीआय किंवा संबंधित अभ्यासक्रमाची पात्रता आणि अनुभव असणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह स्वखर्चाने जवळगाव–काटी रोड, काटी शिवार, ता. तुळजापूर, जि. धाराशिव येथील कारखान्यात उपस्थित राहावे.




