साखरेचे दर वाढवण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा : जयंत पाटील

आवडल्यास ही बातमी शेअर करा

ईश्वरपूर (जि. सांगली) : साखरेच्या दराबाबत सरकार गंभीर नसल्याची टीका आमदार जयंत पाटील यांनी केली. हंगामाच्या तोंडावर देशात साखरेचा तुटवडा जाणवण्याची शक्यता असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या ५७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रतीक पाटील होते.

साखरेचे दर वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. काळानुसार कारखान्याची कार्यक्षमता वाढवणे आवश्यक असून, त्यासाठी आधुनिकीकरणाचे प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले.

अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी कारखान्याच्या कामकाजाचा आढावा घेतला. गतवर्षीच्या तुलनेत उत्पादनात ६.१३ टक्के वाढ झाल्याचे आणि व्याजावरील खर्च ७० कोटींवरून ४९ कोटी रुपयांपर्यंत कमी केल्याचे त्यांनी सांगितले. इथेनॉल उत्पादनातही १२ टक्के वाढ झाल्याची माहिती त्यांनी दिली.

सभेत साखर कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करण्याची मागणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली. तर कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी तो किमान १५० दिवस चालणे गरजेचे असल्याचे पी. आर. पाटील यांनी सांगितले. कमी वीज वापरणाऱ्या पाणीपुरवठा संस्थांना सरकारने मोफत वीज द्यावी, असा ठरावही सभेत करण्यात आला

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »