कंचेश्वर शुगरमध्ये विविध पदांसाठी भरती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

तिर्हे (ता. उत्तर सोलापूर) : कंचेश्वर शुगर लिमिटेडने कारखान्यातील विविध विभागांमध्ये रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. अभियांत्रिकी, उत्पादन, सुरक्षा, शुगर गोडाऊन आणि केनयार्ड विभागांतील पदांचा यात समावेश आहे.

प्रसिद्धीपत्रकानुसार, अभियांत्रिकी विभागात बॉयलर फोरमन, वॉटरमन, बॉयलर पंपमन यांसह इतर पदे आहेत. उत्पादन विभागात ज्यूस सुपरवायझरसह विविध पदे, तर सुरक्षा विभागात सुरक्षा जमादार आणि सुरक्षा गार्डची पदे नमूद आहेत. शुगर गोडाऊनसाठी गोडाऊन किपर व गोडाऊन क्लार्क आणि केनयार्डसाठी काटा क्लार्क व नंबर टेकरची पदे आहेत. पदानुसार शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाच्या अटी वेगवेगळ्या आहेत.इच्छुक उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता, अनुभव, अपेक्षित पगार आणि मोबाईल क्रमांक यांचा तपशील, तसेच कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत kancheshwarsugarirhe@gmal.com या ई-मेल पत्त्यावर पाठवाव्यात, असे आवाहन कंपनीने केले आहे. पत्रकात प्रत्यक्ष मुलाखतीची तारीख दिलेली नाही.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »