बगॅस : आणखी वाढवू शकतो कारखान्यांची श्रीमंती!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

हमखास उत्पन्नाचा स्रोत, त्याच्या बहु उपयोगितेकडे दुर्लक्ष नको!

Shrikant Shinde, Cogen Asso

श्रीकांत शिंदे

साखर कारखान्यात साखर निर्मिती करताना इतर उपपदार्थ निर्माण होतात. उसामध्ये 12 टक्के साखर, 30 टक्के बगॅस, 50 टक्के पाणी, 4 टक्के प्रेस मड व 4 टक्के मळी तयार होते. सर्व उपपदार्थ अत्यंत महत्वाचे असून त्याचा कार्यक्षमतेने वापर केल्यास साखर कारखाने ऊर्जित अवस्थेत येऊ शकतात. या मधील 12 टक्के साखरेवर बहुसंख्य कारखाने अवलंबून आहेत.

ऊसातील महत्त्वाचा घटक बगॅस असून त्याचे अनेक उपयोग आहेत. जसे वीज निर्मितीसाठी, पेपर, पार्टिकल बोर्ड, जनावरांचे खाद्य, बॉयलर इंधन, सेंद्रिय खते, प्लास्टिक, थर्मो प्लास्टिक, खेळणी, फर्निचर, 2 जी इथेनॉल, बायो केमिकल्स तयार करण्यासाठी, इलेक्ट्रिकल इन्सुलेटर्स, बायो डिग्रेडेबल रेझिन्स, कॉम्प्रेसड बायो गॅस निर्मितीसाठी, टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये सेल्युलोज बेस्ड रेयॉन किंवा विस्कॉस, खते किंवा जमिनीचा पोत सुधारण्यासाठी इ. असे किती तरी बगॅसचे उपयोग आहेत.

Bagasse Uses

बगॅस एक, उपयोग अनेक

याच बरोबर आता बगॅसपासून कुकी सारखी बिस्किटे तयार होऊ लागली आहेत. प्राज या कंपनीने बगॅसपासून इथेनॉल निर्मिती करण्याचा नवीन प्रयोग यशस्वी केला आहे. इतके सर्व व उपयुक्त प्रकार बगॅसपासून बनत असले तरी बगॅसकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून बदललेला नाही, आजही बगॅसकडे टाकाऊ पदार्थ म्हणून पाहिले जाते. राज्यामध्ये बगॅस बचतीचे प्रमाण सरासरी 5 टक्के च्या दरम्यान आहे.

बगॅस बचतीचे प्रमाण वाढवण्यास खूप वाव आहे. पूर्वी बगॅस साठवणे, त्याची निगा राखणे जिकिरीची बाब होती, बाजारात बगॅसला नगण्य भाव होता. बगॅस लगेच पेट घेणार पदार्थ असल्यामुळे साठवण धोक्याचे होते. त्यामुळे साखर निर्मितीमध्ये जितका बगॅस तयार होईल तितका तो बॉयलरमध्ये जाळला जाईल याकडे सर्वांचा कल होता. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. बगॅसला खूप महत्व  प्राप्त झाले आहे, तो वाचण्यात व त्यातून अधिक उत्पन्न मिळवण्यात शहाणपण आहे.

बगॅस वाचवण्याचे उपाय व पद्धत:

इतके मौलिक उपयोग असताना साखर कारखान्यात बगॅस  वाचवण्यासाठी किंवा त्यांची योग्य साठवणूक करण्यासाठी म्हणावे तसे लक्ष दिले जात नाही.  बगॅस किती तयार झाला, बॉयलरला किती वापरला, शिल्लक किती याचा ताळेबंद अंदाजे मांडला जातो. बगॅसची कुठेही तांत्रिक पद्धतीने मोजमाप केले जात नाही. बॉयलर मध्ये नेमका किती व कोणत्या आर्द्रतेचा बगॅस जाळण्यासाठी गेला व त्याला अनुसरून बॉयलरची कार्यक्षमता किती याचा हिशेब मिळत नाही. 

महाराष्ट्रात कोणत्याही साखर कारखान्यात बगॅसचे वजन करण्याची शास्त्रशुद्ध  पद्धत वापरलेली दिसून येत नाही. उसापासून  साखर निर्मिती  करताना 12% साखर 30 % बगॅस 4 % मोलॅसीस, 4 % प्रेस मड व 50 % पाणी मिळते. साखरे नंतर सर्वात जास्त मिळणारा उपयुक्त घटक बगॅस आहे.  बगॅसची बाजारात किंमत सीझनप्रमाणे बदलते. रु. 1500 ते 3000 प्रति मे. टन साखर कारखान्याचे आर्थिक दिशा बदलणारे उपयुक्त घटक बगॅसपासून तयार होतात. पुढील येणारे दशक हे बगॅस चे असेल त्या साठी आपण  सिद्ध होणे आवश्यक आहे.

बगॅसच्या वजन करण्याच्या पद्धती :

  • 1. वे- ब्रीज सिस्टीम – डायनॅमिक वेईंग, लोड सेल, कन्ट्रोल सिस्टीमला जोडणारी यंत्रणा (स्काडा, डीसीएस इ.)
  • 2. कन्व्हेअर वेईंग – बेल्ट वेईंग, कन्टीन्युअस वेईंग, फ्लो रेट मेझरमेन्ट.
  • 3. टोमेटेड फीड विइथ वेईंग – बॉयलरची कार्यक्षमता तपासण्यासाठी उपयुक्त
  • 4. मॉईश्चर कन्टेन्ट सेन्सर – ऑनलाइन मॉईश्चर कन्टेन्ट सेन्सर
  • 5. डाटा इन्टिग्रेशन आणि रिपोर्टिंग – स्काडा सिस्टीम, स्काडा डाटा अ‍ॅनालिटिक्स (Scada Data ­Analytics)

   ऑफ बॉयलरची फीड ऑपरेशन कोजन प्रकल्पात उपयुक्त.

बगॅस वजन मोजणारी यंत्रे तयार करणार्‍या कंपन्या:

1.     स्नेक प्रोसेस (Sehenck Proces),

2.     सीमेन्स (SIEMENS,

3.     व्हेरी वे ट्रॉनिक्स (Very Weight Tronix),

4.     राईस ले वेंईग सिस्टीम (Rice Weighing System),

5.     मेल्टर टेलिडो (Mettler Toledo)

6.     आर्टिफिशियल इन्टेलिजन्स (AI) द्वारा बगॅसेचे तंत्रशुद्ध वजन करणे शक्य होत आहे.

    सेन्सर इन्टिग्रेटेड आणि डेटा कलेक्शन, रियल टाईम अ‍ॅनालिसिस, इमेज प्रोसेसिंग.

मॅनेजमेन्टचे फायदे :- रियल टाईम मॉनिटरिंगसाठी वापर, इन्व्हेटरी मॅनेजमेंट, प्रोसेस ऑप्टिमायझेशन

बगॅस वाचवण्याचे उपाय:

1.     साखर निर्मितीसाठी वाफेचा कमीत कमी वापर

2.     कोजन प्लँटमध्ये एचपी हिटर (HP Heater) चा वापर करणे.

3. बॉयलरची कार्यक्षमता सुधारणे

4. बगॅस मधील आर्द्रता (Moisture) कमी ठेवणे

5. बगॅस साठवताना काळजी घेणे

6. बगॅस खरेदी-विक्री त्यांचे व्यवस्थापन करणे

7. मिलिंगची कार्यक्षमता सुधारणे.

स्टीम सेविंग:

पूर्वी एक टन ऊस गाळपासाठी 50 टक्के वाफ लागत होती. त्यामुळे स्टीम तयार करण्यासाठी जवळ जवळ सगळा  बगॅस खर्ची पडत होता. परंतु आता हे प्रमाण 25 टक्के पर्यंत खाली आले आहे. अजून यामध्ये नवीन प्रयोग चालू आहेत, ते जर यशस्वी झाले तर हेच प्रमाण 20 टक्यापर्यंत खाली येणे शक्य आहे. म्हणजे आजचे राज्याचे सरासरी 5 टक्के सेविंग चे प्रमाण हे 20- 25 टक्क्यांपर्यंत वाढवण्यास वाव आहे. याचा अर्थ सरासरी राज्यातील ऊस गाळपाचे प्रमाण दरसाल 10 कोटी मेट्रिक टन धरल्यास पूर्वी 40 लाख मेट्रिक टन इतका बगॅस वाचत होता, तो साधारण 200 लाख मेट्रिक टन होऊ शकतो.

Bagasse uses

मिलिंग अत्यंत उत्तम असल्यास बॅगसमधील आर्द्रता (Moisture) 45% इतक्या पर्यंत कमी होते, जर  अत्यंत खराब असल्यास ते 52% पर्यंत वाढू शकते.  बगॅसची कॅलोरीफिक व्हॅल्यू (उष्मांक) 50 % आर्द्रतेसाठी 2250 किलो कॅलरी प्रति किलो तर 25% आर्द्रतेसाठी 3410 किलो कॅलरी प्रति किलो वाढू शकते.

Bagasse uses Chart

बगॅस 50% आर्द्रतेवरून 35% आद्रते पर्यंत वाळवल्यास बॉयलरची एकूण कार्यक्षमता 5% ने वाढते कारण सर्वांचा एकूण परिणाम होऊन नेट कॅ लोरीफिक 2250 कॅलरीज/किलो ते 4599 कॅलरीज/किलो वाढते, त्याचा परिणाम-     

  • *बॉयलर इफिशियन्सीमध्ये वाढ.
  • *बॉयलरचा लोड कमी होतो.
  • *प्रदूषण कमी होते.
  • *बॅगस वाचण्यात मदत होते.
  • *बॉईलरचा देखभाल व दुरुस्तीचा खर्च कमी येतो.

*पॉवर आउटपुट वाढते- अंदाजे 2600 टी.सी.डी. क्षमते च्या प्रकलपात  30% आर्द्रता (Moisture) कमी झाल्यास वीज निर्मितीचे उतपादन 15000 मे. वॅट ने वाढते. आर्द्रता  1 % कमी केल्यास 0. 1 ते 0. 2 % बॉयलरची कार्यक्षमता वाढते 5 % मॉइश्चर  कमी केल्यास 1-2 % कार्यक्षमता वाढते.

Bagasse uses

भुश्याची (बगॅस) साठवण :

  • भुसा हा आकस्मिक पेट घेणारा (Spontaneous Burning) पदार्थ आहे, त्यामुळे त्याची साठवण  करताना खूप काळजी घ्यावी लागते.
  • भुसा बेल्ड स्वरूपात साठवताना काँक्रीट फाउंडेशनवर पिरॅमिड सारखा ठेवावा.
  • पिरॅमिडची साइज 23  मीटर X 45 मीटर असावी
  • पिरॅमिडचा पाया (Platform) 2  फूट उंच काँक्रीटचा असावा
  • दोन पिरॅमिडमध्ये 20 मी. अंतर हवे, ट्रक, ट्रॅक्टर फिरण्या साठी असावा.
  • सरासरी 600 ते 700 मे. टन.  भुसा हा प्रत्येक  पाया वरती साठवला जाऊ शकतो    
  • उन्हाळ्यात तापमान कमी करण्यासाठी पाणी फवारणीची (वॉटर स्प्रिंकलर) यंत्रणा आवश्यक आहे
  • उन्हाळ्यात तापमान 350C पर्यंत खाली ठेवणे
  • पावसाळ्यात भुसा भिजू नये म्हणून प्लास्टिकचे आच्छादन टाकावे
  • फायर प्रोटेक्शन ची योजना असावी
  • इन्शुरन्स काढलेला असावा

(लेखक श्रीकांत शिंदे हे कोजेनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाचे पदाधिकारी आहेत.)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »