‘श्रीनाथ’चे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांना डी. लिट. पदवी

पुणे : श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक पांडुरंग राऊत यांना येथील ‘अजिंक्य डी वाय पाटील अभिमत विद्यापीठा’च्या वतीने डॉक्टर ऑफ लेटर्स (डी. लिट.) ही मानद पदवी देऊन, त्यांचा गौरव केला जाणार आहे. विद्यापीठाने याबाबतची घोषणा नुकतीच केली.
श्री. पांडुरंग राऊत हे गेल्या चार दशकांपासून सामाजिक व औद्योगिक क्षेत्रात कार्यरत आहेत. या दोन्ही क्षेत्रांमध्ये त्यांनी भरीव योगदान दिले आहे.
राहू (दौंड) जवळ त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांना सोबत घेऊन श्रीनाथ म्हस्कोबा हा खासगी साखर कारखाना २००४ साली सुरू केला. कमी खर्चात, उत्तमपणे कारखाना कसा चालवता येतो याचा आदर्श त्यांनी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यांच्या माध्यमातून उभा केला आहे.
डॉ. डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाने राऊत यांच्या योगदानाची दखल घेऊन, त्यांना डी. लिट. पदवी देण्याचा निर्णय घेतला.

या सन्मानाबद्दल ‘शुगरटुडे’ (SugarToday Magazine) बोलताना श्री. पांडुरंग राऊत यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, ‘ खरं तर मी कोणत्याही सन्मान किंवा पुरस्कारासाठी काम करत नाही. मी शेतकरी आणि सामान्य जनतेच्या भल्यासाठी गेल्या चार दशकांपासून माझ्या परीने कार्यरत आहे. हे फार मोठे काम नाही. मात्र त्याची दखल एका नामवंत विद्यापीठाने घेतली आणि डॉक्टर ऑफ लेटर्स ही मानद पदवी देऊन माझा सन्मान करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल मी विद्यापीठाचा आभारी आहे. त्यामुळे मला सामाजिक कामासाठी आणखी हुरूप आला आहे.’

‘शुगरटुडे’ मॅगेझीनच्या वतीने श्री. पांडुरंग राऊत यांचे खूप खूप अभिनंदन.