उसाला ५५०० रुपये दरासाठी शेतकऱ्यांचे हुबळीत धरणे; जोशींच्या निवासस्थानासमोर ठिय्या

आवडल्यास ही बातमी शेअर करा

हुबळी : उसाला प्रतिटन ५५०० रुपये दर द्यावा आणि साखरेचा किमान हमीभाव प्रतिकिलो ३१ रुपयांवरून ६० रुपये करावा, या प्रमुख मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. २९) केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन सुरू केले.

राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि विविध शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले आहेत.केंद्र सरकारने उसाची एफआरपी वाढविली असली, तरी साखरेचा किमान हमीभाव प्रतिक्विंटल ३१०० रुपये, म्हणजेच प्रतिकिलो ३१ रुपये कायम असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

या विसंगतीमुळे साखर कारखान्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून, शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देणेही कठीण होत असल्याचा दावा त्यांनी केला. मजुरी, रासायनिक खते, कीटकनाशके आणि ऊस तोडणी व वाहतुकीच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सध्याच्या दरातून उत्पादनखर्च भागविणे अवघड होत असल्याची भूमिका आंदोलकांनी मांडली.

उसाला योग्य दर आणि साखरेच्या हमीभावात वाढ मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार शेतकरी संघटनांनी व्यक्त केला. आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीतआंदोलनात बेळगाव, हुबळी, धारवाड, विजापूर, बागलकोट, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील शेतकरी सहभागी झाले.

आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या दिल्याने परिसरातील वाहतूक ठप्प झाली. वाहनांच्या लांब रांगा लागल्याने नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागला.पोलिसांनी मोर्चा रोखलाशेतकऱ्यांनी जोशी यांच्या कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा दिला होता. मात्र, पोलिसांची परवानगी न मिळाल्याने मैदानात आंदोलन करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानंतर आंदोलकांनी घोषणा देत जोशी यांच्या निवासस्थानाकडे मोर्चा काढला. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून त्यांना रोखले. पुढे जाण्याच्या प्रयत्नात काही काळ तणाव निर्माण झाला.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »