उसाच्या शेतात गांजाची लागवड; आलगीत एक कोटीचा मुद्देमाल जप्त

आवडल्यास ही बातमी शेअर करा

अक्कलकोट : उसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याप्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलिसांनी आलगी येथे कारवाई करून २११ किलो ९०० ग्रॅम वजनाची गांजाची झाडे जप्त केली. जप्त मुद्देमालाची किंमत १ कोटी ५ लाख ९५ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी एका ६० वर्षीय संशयिताला अटक करण्यात आली आहे.

२८ सप्टेंबर रोजी गस्तीवर असताना पोलिसांना आलगी येथे गांजाची लागवड केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार संबंधित शेतात छापा टाकला असता, उसाच्या पिकामध्ये तीन ठिकाणी गांजाची झाडे आढळली. यातील काही झाडांची उंची सुमारे १२ फूट होती.

पोलिसांनी पंचनामा करून एकूण २४० झाडे जप्त केली. त्यांपैकी २२० झाडे जिवंत, तर २० वाळलेली असल्याचे पोलिसांनी सांगितले. जप्त केलेल्या झाडांचे एकूण वजन २११ किलो ९०० ग्रॅम भरले.

अटक केलेल्या संशयिताला न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »