भारत आता इथेनॉलचा तिसरा सर्वात मोठा उत्पादक आणि ग्राहक : जोशी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

साखर उद्योगाने स्पर्धात्मक राहण्यासाठी शेतकरी केंद्रित धोरणे सुरू ठेवावी

नवी दिल्ली (PIB): आमच्या सरकारने केलेल्या धोरणात्मक बदलांमुळे भारत आता इथेनॉलचा जगातील तिसरा सर्वात मोठा उत्पादक आणि ग्राहक बनला आहे, असे केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी यांनी इंडिया शुगर अँड बायो एनर्जी कॉन्फरन्सला संबोधित करताना सांगितले.

इथेनॉल मिश्रित पेट्रोल (EBP) कार्यक्रमाविषयी बोलताना केंद्रीय मंत्री जोशी म्हणाले की, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भारतात इथेनॉल उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. गेल्या 10 वर्षांत, इथेनॉल विक्रीतून साखर कारखान्यांनी जास्त महसूल मिळवला आहे, इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा वापर करून हरितगृह वायूंचे (GHGs) उत्सर्जन कमी केले आहे, गुंतवणुकीच्या मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत, ज्यामुळे ग्रामीण भागात नवीन डिस्टिलरीजची स्थापना झाली आहे आणि थेट योगदान दिले आहे आणि अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती देखील झाली आहे.”
अमेरिका आणि ब्राझील हे दोन देश इथेनॉल उत्पादनामध्ये जगात अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. पाचव्या स्थानावर असलेल्या भारताने चीन आणि युरोपला मागे टाकून तिसरा क्रमांक पटकावला आहे.
पुढे त्यांनी भर दिला की, केंद्र सरकार एका मजबूत, शाश्वत साखर उद्योगासाठी वचनबद्ध आहे जो केवळ आर्थिक आधारस्तंभच नाही, तर भारताच्या नवीकरणीय ऊर्जेच्या लँडस्केपमध्ये एक प्रेरक शक्ती देखील आहे. ते म्हणाले की, भारतातील साखर आणि जैव-ऊर्जा क्षेत्र जागतिक स्तरावर स्पर्धात्मक राहतील याची खात्री करण्यासाठी उद्योगाने नावीन्यपूर्ण, सार्वजनिक-खासगी भागीदारी आणि शेतकरी-केंद्रित धोरणांच्या मार्गावर पुढे जाणे आवश्यक आहे.

श्री.जोशी म्हणाले की, गेल्या 10 वर्षात ऊस लागवड क्षेत्रात सुमारे 18% वाढ झाली आहे, तर ऊस उत्पादनात 40% वाढ झाली आहे. ते म्हणाले की केंद्राने शेतकरी आणि साखर उद्योगाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी 2018 मध्ये साखरेची किमान विक्री किंमत (MSP) लागू केली होती.

“एमएसपी लागू झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या उसा बिलांच्या थकबाकीचे क्षेत्र आता भूतकाळातील गोष्ट बनली आहे. भारतातील उसा बिलाची थकबाकी ही सर्वकालीन नीचांकी आहे आणि रु.१.१४ लाख कोटी रूपयांपैकी सुमारे 99% उसाची बिले साखर उद्योगाच्या पाठिंब्याने शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहेत,” असे ते म्हणाले.
,
मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या भूमिकेवर भर दिला आणि ते म्हणाले, “आमचे शेतकरी अन्नदाता तर आहेतच ते आता ऊर्जादाताही बनत आहेत, भारताच्या अक्षय ऊर्जेच्या लँडस्केपमध्ये त्यांनी बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका त्यांची ऊर्जादाता ही प्रतिमा प्रतिबिंबित करते.” ते म्हणाले की, कृषी आणि हरित ऊर्जा यांच्यातील हा समन्वय भारतासाठी 2070 पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जनाच्या जागतिक हवामानाच्या उद्दिष्टांशी संरेखित करून भारतासाठी टिकाऊ आणि लवचिक भविष्य निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे.

श्री. जोशी म्हणाले की, भारत हा ब्राझीलच्या खालोखाल ऊस उत्पादन करणारा दुसरा सर्वात मोठा देश आहे आणि त्यामुळे दोन्ही देश इथेनॉल, बायोडिझेल, बायोजेट इंधन इत्यादी जैवइंधनाच्या उत्पादनासाठी आणि वापरासाठी सहकार्य करू शकतात. बायोएनर्जी, 2 जी आणि 3 जी इथेनॉल, ग्रीन हायड्रोजन आणि जैव-प्लास्टिक या क्षेत्राने जैवइंधन आणि फ्लेक्स-इंधन तंत्रज्ञानातील गुंतवणूकीला प्रोत्साहन देण्यासाठी तंत्रज्ञानाची देवाणघेवाण, संयुक्त संशोधन आणि विकास यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. ग्लोबल बायोफ्यूल्स अलायन्समध्ये अनेक नवीन संधी आहेत.

भारत ही अन्नधान्याची वैश्विक बास्केट आहे. जागतिक स्तरावर भारत ब्रँड आणि भारतीय खाद्यपदार्थाचा प्रचार करण्यासाठी, टिकाऊ पॅकेजिंगला प्रोत्साहन दिले जाते, असेही जोशी म्हणाले.

यावेळी अन्न आणि सार्वजनिक वितरण सचिव संजीव चोप्रा म्हणाले की, चांगल्या पावसामुळे उत्तम पीक अपेक्षित आहे आणि त्यामुळे 2024-2025 मध्ये साखर हंगामात उत्पादन चांगले दिसते. पुढे ते म्हणाले की, केंद्राच्या हस्तक्षेपामुळे आणि धोरणांमुळे साखरेचे दर स्थिर असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »