मराठी विश्वकोषाचे शिल्पकार

आज मंगळवार, मे २७, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर ज्येष्ठ ६, शके १९४७
सूर्योदय : ०६:०१ सूर्यास्त : १९:११
चंद्रोदय : चंद्रोदय नहीं चंद्रास्त : १९:४२
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
उत्तरायण
ऋतु : वसंत
चंद्र माह : वैशाख
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : अमावस्या – ०८:३१ पर्यंत
क्षय तिथि : प्रतिपदा – ०५:०२, मे २८ पर्यंत
नक्षत्र : रोहिणी – ०२:५०, मे २८ पर्यंत
योग : सुकर्मा – २२:५४ पर्यंत
करण : नाग – ०८:३१ पर्यंत
द्वितीय करण : किंस्तुघ्न – १८:४५ पर्यंत
क्षय करण : बव – ०५:०२, मे २८ पर्यंत
सूर्य राशि : वृषभ
चंद्र राशि : वृषभ
राहुकाल : १५:५३ ते १७:३२
गुलिक काल : १२:३६ ते १४:१४
यमगण्ड : ०९:१८ ते १०:५७
अभिजित मुहूर्त : १२:०९ ते १३:०२
दुर्मुहूर्त : ०८:३९ ते ०९:३१
दुर्मुहूर्त : २३:३१ ते ००:१४, मे २८
अमृत काल : २४:०० ते ०१:२५, मे २८
वर्ज्य : १९:४४ ते २१:०९
१९६४: भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर, १८८९)
तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी – यांचे संस्कृत भाषेवर प्रभुत्व होते, हिंदू धर्माचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. त्यांचा जन्म २७ जानेवारी १९०१ रोजी धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे झाला. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत इत्यादी शास्त्रांवर ते अधिकारवाणीने बोलू शकत. हिंदू तत्त्वज्ञान त्यांनी चांगल्या प्रकारे अवगत केले होते.
लक्ष्मण शास्त्री जोशी यांची ओळख मुख्यत: मराठी विश्वकोषाचे शिल्पकार’ अशी असली, तरी ती ओळख अपुरी म्हणावी लागले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते थोर स्वातंत्र्य सैनिक, साहित्यिक, समाजसुधारक, हिंदू धर्माचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, अशी अनेक विशेषणे तर्कतीर्थांच्या नावापुढे लावणे शक्य आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे बिरुद म्हणजे त्यांना मिळालेली
तर्कतीर्थ’ ही पदवी !
देशाच्या स्वातंत्र्यानंतर तर्कतीर्थांना अनेक पुरोगामी बुद्धिवाद्यांचा सहवास लाभला. एम. एन. रॉय हे त्यांपैकीच एक. १९५१ साली सरदार वल्लबभाई पटेल यांनी सोरटी सोमनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरविले. जीर्णोद्धारानंतर मंदिर अस्पृश्यांसहित सर्वांना खुले करण्यात येणार होते. नेमके याच गोष्टीमुळे काशीच्या कर्मठ पंडितांनी मूर्ती प्रतिष्ठापनेचे धार्मिक विधी करण्यास नकार दिला. या काळातही तर्कतीर्थांनी आपल्या तर्कशुद्ध बुद्धीने पंडितांना पटवून दिले की, असे करण्यात कोणताही धर्मलोप नाही, उलट हाच खरा हिंदू धर्माचा विचार आहे.
१९५१ साली त्यांनी पुणे विद्यापीठात सहा प्रदीर्घ व्याख्याने दिली. त्या व्याख्यानांवर आधारीत `वैदिक संस्कृतीचा विकास’ हा ग्रंथ त्यांनी लिहिला. या ग्रंथाद्वारे त्यांनी भारतीयांना वैदिक धर्मावर आधारीत जीवनशैलीचा अंगीकार करण्याचे आवाहन केले.
भौतिक सुख आणि अध्यात्म यांच्या कात्रीत भारतीय समाज सापडला आहे. त्यामुळे तो गोंधळलाही आहे, असे त्यांनी अतिशय तर्कशुद्ध रितीने प्रतिपादन केले. हा ग्रंथ अतिशय प्रभावी झाला.
१९५५ साली या ग्रंथाला साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला. अर्थातच त्यांचे विचार काही कर्मठ पंडितांना पटण्यासारखे नव्हते. त्यामुळे तर्कतीर्थांना अशा तथाकथित पंडितांच्या वर्तुळात स्थान नव्हते. पण महाराष्ट्राचे द्रष्टे नेते यशवंतराव चव्हाण यांनी मात्र तर्कतीर्थांच्या विचारांवर संपूर्ण विश्वास टाकला. १९६० साली दोन अतिमहत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे काम तर्कतिर्थांवर सोपविण्यात आले. पहिला म्हणजे मराठी विश्वकोषा’ची निर्मिती, तर दुसरा
धर्मकोषा’ची निर्मिती. ही दोन्ही कामे अतिशय अवघड अशी होती. विश्वकोष’ आणि
धर्मकोष’ यांसारख्या ग्रंथांची निर्मिती करण्याचे काम त्यांच्यावर सोपविण्यात आले, त्याचे कारणही तसेच होते. त्यांनी त्याआधीसुद्धा अनेक महाकाय ग्रंथ लिहिले होते.
शुद्धिसर्वस्वम्’ हा त्यांनी लिहिलेला पहिला ग्रंथ संस्कृत भाषेत होता, आणि तो १९३४ साली प्रकाशित झाला. त्याच वर्षी त्यांनी
धर्ममोक्ष’ या ग्रंथाचे अठराशे पानांचे सहा अध्याय लिहिले. हिंदू धर्माची समीक्षा’,
वैदिक संस्कृतीचा विकास’, आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा’, इत्यादी अनेक उत्तमोत्तम ग्रंथांची निर्मिती करून त्यांनी मराठी भाषेतील साहित्य समृद्ध करण्यात मोलाचा वाटा उचलला. त्यांनी अठरा प्रमुख उपनिषदांचे मराठीत भाषांतरही केले. प्राचीन वैदिक धर्माचे समर्थक असूनही तर्कतीर्थ यांना वास्तवाचे भान होते. आधुनिक शास्त्रे, इंग्रजी भाषा, भारताची औद्योगिक प्रगती यांबाबत त्यांचे विचार अतिशय पुरोगामी होते. त्यामुळे तर्कतीर्थ हे अनेक जणांचे प्रेरणा स्थान राहिले. भारत सरकारने तर्कतीर्थांना १९७६ साली
पद्मभूषण’, तर १९९२ साली `पद्मविभूषण’ पुरस्कार देऊन गौरव केला होता. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी यांचे २७ मे १९९४ रोजी निधन झाले.
• १९९४: विचारवंत लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे निधन. (जन्म: २७ जानेवारी ,१९०१)
मिनोचेर रुस्तम ” मिनू ” मसानी- लंडनला जाण्यापूर्वी मसानी यांचे शिक्षण बॉम्बेमध्ये झाले होते जेथे त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेतले होते. आणि १९२८ मध्ये लिंकन्स इन येथे बॅरिस्टर म्हणून प्रशिक्षण घेण्यापूर्वी त्यांनी कायद्याची पदवी प्राप्त केली होती.
सविनय कायदेभंग मोहिमेदरम्यान पुढील वर्षी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सामील होण्यापूर्वी त्यांनी १९२९ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात वकील म्हणून आपल्या व्यावसायिक जीवनाची सुरुवात केली . चळवळीत भाग घेतल्याबद्दल ब्रिटिशांनी त्यांना अनेकवेळा अटक केली. १९३२ मध्ये ते नाशिक कारागृहात होते तेव्हा जयप्रकाश नारायण त्यांच्या संपर्कात आले आणि त्यांनी १९३४ मध्ये काँग्रेस सोशलिस्ट पार्टीची स्थापना केली. १९४२ मध्ये त्यांनी भारत छोडो आंदोलनात भाग घेतला आणि पुन्हा तुरुंगवास भोगला. तुरुंगवासाची मुदत संपल्यानंतर त्यांनी विधानसभेच्या राजकारणात प्रवेश केला, ते मुंबई महानगरपालिकेचे महापौर म्हणून निवडून आले.
त्यांनी भारतीय संविधान सभेचे सदस्य म्हणून काम केले , भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतिनिधित्व केले . त्यांनी १९४७ मध्ये भारतीय राज्यघटनेत समान नागरी संहितेचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला , जो फेटाळण्यात आला.
त्यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात मुंबई महानगरपालिकेत झाली, जिथे त्यांची १९४३ मध्ये महापौर म्हणून निवड झाली. ते भारतीय विधानसभेचे सदस्यही झाले . ऑगस्ट १९६० मध्ये, त्यांनी सी. राजगोपालाचारी आणि एनजी रंगा यांच्यासमवेत स्वतंत्र पक्षाची स्थापना केली , जेव्हा आंतरराष्ट्रीय साम्यवाद त्याच्या शिखरावर होता.
. ते तीन वेळा खासदार होते , त्यांनी दुसऱ्या , तिसऱ्या आणि चौथ्या लोकसभेत गुजरातच्या राजकोट मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते . ते भारतीय उदारमतवादी समूहाच्या थिंक टँकच्या संस्थापकांपैकी एक होता ज्याने शास्त्रीय उदारमतवादाचा प्रचार केला .
पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बँकांच्या राष्ट्रीयीकरणाला विरोध करणाऱ्या काही राजकारण्यांपैकी ते एक होते . स्वतंत्र पक्ष हा संसदेतील भारतातील सर्वात मोठा विरोधी पक्ष होता आणि मसानी लोकसभेत त्याचे नेते होते, त्यांनी वित्त विधेयकांवर चर्चा सुरू केली आणि काँग्रेस सरकारला कठोरपणे काम करण्यास भाग पाडले. ते पीएसीचे प्रमुखही होते . त्यांच्या भाषणांचा संग्रह काँग्रेस मिसरूल आणि स्वतंत्र पर्याय म्हणून प्रकाशित झाला . १९७१ च्या सार्वत्रिक निवडणुकीत स्वतंत्र पक्षाची कामगिरी चांगली झाली नाही आणि त्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. १९७१ नंतर त्यांनी फ्रीडम फर्स्ट या मासिकाचे लेखन व संपादन केले . सरकारने मासिकावर सेन्सॉरशिपचा आदेश जारी केल्यावर त्यांनी काँग्रेस सरकारच्या विरोधात उभे केले. त्याने कोर्टात ऑर्डर लढवली आणि जिंकली.
मसानी हे लेखकही होते आणि त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे पहिले पुस्तक, अवर इंडिया , हे स्वातंत्र्यपूर्व भारतात सर्वाधिक विक्री करणारे आणि अगदी विहित पाठ्यपुस्तक होते. तसेच, झोरोस्ट्रिनिझम: द रिलिजन ऑफ द गुड लाईफ (1938), आपला भारत (१९४०) , समाजवादाचा पुनर्विचार (१९४४) , योजनेचे चित्र (1945) इ. त्यांची लेखन संपदा आहे.
• १९९८: अर्थतज्ञ मिनोचर रुस्तुम तथा मिनू मसानी यांचे निधन. (जन्म: २० नोव्हेंबर, १९०५)
- घटना :
१७८४ : सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात बांधलेल्या आणि तळ्यातला गणपती या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या सारसबागेतील मंदिराला आज २३९ वर्षे पूर्ण झाली.
१८८३: अलेक्झांडर (तिसरा) रशियाचा झार बनला.
१९०६: महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना.
१९३०: त्याकाळी सर्वात उंच (३१९ मीटर – १०४६ फूट) असलेल्या ख्रायसलर सेंटर या इमारतीचे न्यूयॉर्कमधे उद्घाटन झाले.
१९४१: दुसरे महायुद्ध – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांनी देशात आणीबाणी जाहीर केली.
१९५१: मुंबई येथे तारापोरवाला मत्स्यालय सुरू झाले.
१९६४: गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.
१९९८: ग्रँड प्रिन्सेस या जगातल्या (त्याकाळच्या) सर्वात मोठ्या व सर्वात महागड्या जहाजाने आपल्या पहिल्या सफरीला सुरुवात केली.
१९९९: अमेरिकेचे डिस्कव्हरी हे अंतराळयान नव्या अंतराळस्थानकाकडे झेपावले.
• मृत्यू :
• १९१९: भारतीय लेखक कंधुकुरी वीरसासिंगम यांचे निधन. (जन्म: १६ एप्रिल १८४८)
१९३५: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी रमाबाई भीमराव आंबेडकर यांचे निधन. (जन्म: ७ फेब्रुवारी, १८९७ )
१९८६: संगीत समीक्षक आणि संस्कृतचे अभ्यासक अरविंद मंगरुळकर यांचे निधन.
१९८६: भारतीय राजकारणी, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री अजय मुखर्जी निधन. (जन्म: १५ एप्रिल ,१९०१)
• २०२० : कामा रुग्णालयाबाहेर दहशतवाद्यांच्या दोन गोळ्या झेलणारे तसेच कसाबला फासापर्यंत नेणारे साक्षीदार हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांचं निधन .
हरिश्चंद्र श्रीवर्धनकर हे कसाबला ओळखणारे पहिले साक्षीदार होते. कसाबला फाशीपर्यंत पोहोचवणाऱ्या मुख्य साक्षीदारांपैकी ते एक होते. हरिश्चंद्र यांनी विशेष न्यायालयासमोर कसाबला ओळखले होते आणि त्याच्याविरुद्ध साक्ष दिली होती.
- जन्म :
१९१३: चित्रकार व नृत्यदिग्दर्शक कृष्णदेव मुळगुंद यांचा जन्म. (मृत्यू: ११ मे, २००४)
१९३८: कादंबरीकार ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ. भालचंद्र वनाजी नेमाडे यांचा जन्म.
१९५७: भारतीय वकील आणि राजकारणी कॅबिनेट मंत्री , नितीन गडकरी यांचा जन्म.
१९६२: उजव्या हाताने फलंदाजी तर डाव्या हाताने गोलंदाजी करणारा भारतीय क्रिकेटर रवी शास्त्री यांचा जन्म.