प्रदूषण स्तर आणखी कमी करणारे तंत्रज्ञान भारतात प्रथमच, उदगिरी शुगरमध्ये

आवडल्यास ही बातमी शेअर करा

विटा : उदगिरी शुगर अँड पॉवर लि. या कारखान्यामध्ये आरपीसी प्रणाली बसवण्यात आली असून, यानिमित्ताने भारतात नवे आधुनिक तंत्रज्ञान आले आहे. ते सर्वात आधी भारतात आणण्याचा बहुमान उदगिरी शुगर अँड पॉवर लि. ला मिळाला आहे. त्यामुळे प्रदूषण स्तर आणखी कमी होणार आहे.


कारखान्याच्या बॉयलरमधून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे प्रदूषण होऊ नये म्हणून इएसपी-ESP (electrostatic precipitator) बसविण्यात येतात. तथापि, जेवढा परिणाम होणे आवश्यक आहे तेवढा दिसत नाही. शिवाय ESP ची किंमतही जास्त असून, त्याचा ऑपेरेशन व मेंटेनन्स खर्चदेखील अधिक आहे.

तसेच ही प्रणाली ‘हाय रिस्क’मध्ये येते. अनेक ठिकाणी त्याचे अपघात होऊन मनुष्यहानीही झालेली आहे.तसेच केंद्रीय पर्यावरण विभागाने हवेतील प्रदूषण 50 mg/mn3 पर्यंत खाली आणलेले आहे. ESP मध्ये ते शक्य होताना दिसत नाही. त्याला पर्याय म्हणून आरपीसी-RPC (Rotary Particles Collector) हे नवीन तंत्रज्ञान विकसित झाले आहे, असे उदगिरी शुगरने म्हटले आहे.

याचे पेटेंट Sidel System, United States यांचे असून त्याचे डिझाईन, मॅन्युफॅक्चरिंग, इरेकशन व कमिशनिंग, इकोमॅट्रिक्स ग्लोबल पुणेचे संचालक आदित्य आवटे यांनी केलेले आहे.

कारखान्याचे संस्थापक डॉ. शिवाजीराव कदम व कारखान्याचे चेअरमन डॉ. राहुलदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सदर RPC ची उभारणी भारतात सर्वात प्रथम उदगिरी शुगरमध्ये ७५ टनी हाय प्रेशर बॉयलर करिता स्थापित केली आहे. सध्या RPC यशस्वीपणे सुरू आहे. सदर मशीन पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातून आणि अन्य राज्यांमधून विविध कारखान्यांचे चेअरमन, संचालक व तांत्रिक अधिकारी येत आहेत.


Dr. Rahul Dada Kadam Birthday

उदगिरी शुगरची कार्यक्षमता वाढवण्याबरोबरच, पर्यावरणाची काळजी घेण्याचा आमचा कायम प्रयत्न राहिला आहे. त्यामुळे आम्ही नेहमी नवे, पण किफायतशीर तंत्रज्ञानाच्या शोधात असतो. आरपीसी तंत्रज्ञानामुळे प्रदूषण पातळी तर कमी होणारच आहे, शिवाय मानवी जीविताचा धोकादेखील कमी होणार आहे.

-डॉ. राहुल कदम,
चेअरमन, उदगिरी शुगर अँड पॉवर लि.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »