13,538 मतदार : ‘राजाराम’ची अंतिम यादी प्रसिद्ध

कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या २०२३-२८ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर कार्यालयाकडून १३ हजार ५३८ पात्र मतदारांची अंतिम यादी बुधवारी प्रसिद्ध करण्यात आली.
१३ हजार ४०९ ऊस उत्पादक सभासद, तर १२९ ‘ब’ वर्ग सभासद आहेत. कारखान्याने सादर केलेल्या १६ हजार ८१५ ऊस उत्पादक व १४३ ‘ब’ वर्ग (संस्था सभासद ) यादीवर हरकतीनंतर गत सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर एकूण ३,४०६ ऊस उत्पादक सभासद यादीतून कमी करत १३ हजार ४०९ ऊस उत्पादक सभासद व ‘ब’ वर्ग (संस्था गट) १२९ सभासदांची यादी अंतिम करण्यात आली आहे.