पेनगंगा कारखान्यात भरती; तरुणांसाठी सुवर्णसंधी!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

बुलडाणा : जिल्ह्यातील वढुड (धाड) येथे असलेल्या पेनगंगा साखर कारखाना प्रा. लि. या अत्याधुनिक साखर कारखान्यात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. दररोज २५०० मेट्रिक टन गाळप क्षमतेच्या या कारखान्यात प्रशिक्षित व होतकरू तरुणांना करिअर घडवण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.

कारखान्याच्या कार्यक्षेत्रात पात्र व गुणवंत उमेदवारांसाठी ‘ट्रेनी’ पदांवर भरती केली जाणार असून, एकूण ४० जागा उपलब्ध आहेत. या भरतीत ट्रेनी केमिस्ट, ट्रेनी इंजिनिअर (मेकॅनिकल), ट्रेनी इन्स्ट्रुमेंट इंजिनिअर आणि ट्रेनी वायरमन या पदांचा समावेश आहे.

शैक्षणिक पात्रतेनुसार B.Sc./M.Sc. (केमिस्ट्री), B.E./डिप्लोमा (मेकॅनिकल/इन्स्ट्रुमेंटेशन) तसेच ITI (वायरमन) उमेदवार अर्ज करू शकतात. निवड झालेल्या उमेदवारांना अनुभवी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देण्यात येणार असून प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव मिळणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी अर्ज, शैक्षणिक कागदपत्रे, गुणपत्रिका, आधार कार्ड व पासपोर्ट फोटोसह अर्ज सादर करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ जुलै २०२६ असून अर्ज प्रशासन विभाग, पेनगंगा साखर कारखाना प्रा. लि., वढुड (धाड), ता. जि. बुलडाणा येथे सादर करावा.

या भरतीमुळे स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून कौशल्य विकासासह उज्ज्वल करिअर घडवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »