रेड रॉट प्रतिबंधक उसाचे नवीन वाण आले

आवडल्यास ही बातमी शेअर करा

रोगप्रतिकारक Co-16030 वाणाला मान्यता
लखनौ
:
ICAR-इंडियन इंस्टिट्यूट ऑफ शुगरकेन रिसर्च, लखनौ येथे उसावरील ऑल इंडिया को-ऑर्डिनेटेड रिसर्च प्रोजेक्ट (AICRP) च्या 34 व्या बैठकीत ऊसाचे एक नवीन वाण, Co-16030 याला मान्यता देण्यात आली.

त्यामुळे ते लवकरच लागवडीसाठी उपलब्ध करून दिले जाईल. या वाणाला करण-16 असेही नाव दिले आहे. . हे वाण कर्नाल (हरियाणा) येथील ICAR-ऊस प्रजनन संस्थेच्या प्रादेशिक केंद्रातील शास्त्रज्ञांनी विकसित केली आहे.

या वाणाचे परीक्षण २०१९ ते २०२२ या कालावधीत उत्तर भारतातील नऊ केंद्रांवर यशस्वीपणे झाले. हे वाण विविध रोगांचा प्रतिकार करते, विशेषत: उत्तर भारतातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान करणाऱ्या लाल्या (रेड रॉट) यालाही प्रतिबंध करते.

तसेच उत्पादन आणि साखर गुणवत्तेसाठी हे वाण अतिउत्तम आहे, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. ते 12 व्या महिन्यात तोडणीला येते. शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होईल, असा दावा त्यांनी केला.

“Co-16030 ही एक क्रॉस व्हरायटी आहे ज्यामध्ये उसाचे व्यावसायिक ऊस उत्पादन, तसेच साखरे उत्पादन प्रमाण चांगले आहे. उसाचे उत्पादन प्रति हेक्टर 94.97 टन आहे, असे प्रादेशिक केंद्राचे प्रमुख डॉ. एस.के. पांडे यांनी सांगितले.

AICRP चाचण्यांमध्ये या जातीची सरासरी सुक्रोज टक्केवारी 17.90 होती, जी इतर जातींच्या तुलनेत श्रेष्ठ आहे, असेही ते म्हणाले.

“Co-16030 ने रेड रॉट, पिवळ्या पानांचा रोग यासाठी चांगली प्रतिकारशक्ती दर्शविली. हे शूट बोअरर, टॉप बोअरर आणि देठ बोअररसाठी (विविध किडी) सर्वात कमी संवेदनाक्षम म्हणून देखील सिद्ध झाले आहे,” असे डॉ पांडे म्हणाले.

CoS-767, CoPant 97222, आणि Co-0501 यांसारख्या गटांमधील विद्यमान वाणांसाठी ही नवी जात योग्य पर्याय म्हणून काम करू शकते, असा दावा त्यांनी केला.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »