छत्रपती संभाजी महाराज

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज बुधवार, मे १४, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर वैशाख दिनांक २४, शके १९४७
सूर्योदय : ०६:०४ सूर्यास्त : १९:०६
चंद्रोदय : २०:४४ चंद्रास्त : ०६:५४
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
उत्तरायण
ऋतु : वसंत
चंद्र माह : वैशाख
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : द्वितीया – ०२:२९, मे १५ पर्यंत
नक्षत्र : अनुराधा – ११:४७ पर्यंत
योग : परिघ – ०६:३४ पर्यंत
करण : तैतिल – १३:३४ पर्यंत
द्वितीय करण : गर – ०२:२९, मे १५ पर्यंत
सूर्य राशि : मेष – ००:२१, मे १५ पर्यंत
चंद्र राशि : वृश्चिक
राहुकाल१२:३५ ते १४:१३
गुलिक काल : १०:५७ ते १२:३५
यमगण्ड : ०७:४२ ते ०९:२०
अभिजित मुहूर्त : कोई नहीं
दुर्मुहूर्त : १२:०९ ते १३:०१
अमृत काल : ०४:२८, मे १५ ते ०६:१३, मे १५
वर्ज्य : १७:५६ ते १९:४१

श्रीशंभूराजे उर्फ संभाजीराजे यांचे सुबक (संभाजी राजे स्तुती) –
तस्यात्मज:शंभुरिति प्रसिद्ध:समस्तसामन्त शिरोवतंस:| य:काव्यसाहित्य पुराणगीतकोदण्डविद्यार्णव पारगामी ||

अर्थ: अशा त्या थोर शिवप्रभूंच्या समस्त मांडलिकामध्ये शिरोभूषण म्हणून शोभणारा आत्मज (आत्मन् चा अंश) शंभू(राजा)म्हणून प्रसिद्धीस आला.तो काव्य, साहित्य, संगीत,धनुर्विद्या इ.चा कलासागर पार केलेला होता.(पारंगतच झालेला होता.)

१६५७: छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ११ मार्च, १६८९)

सर नारायण गणेश चंदावरकर –
अखिल भारतीय काँग्रेसच्या मूळ संस्थापकांपैकी एक निष्ठावान सभासद, कायदेपंडित आणि समाजसुधारक. होनावर (उत्तर कॅनरा) या ठिकाणी सुखवस्तू कुटुंबात जन्म. त्यांचे बहुतेक शिक्षण मुंबईस एल्फिन्स्टनमध्ये झाले. बी.ए. नंतर वयाच्या बाविसाव्या वर्षी ते इंदुप्रकाश या द्वैभाषिक साप्ताहिकाच्या इंग्रजी विभागाचे संपादक झाले(१८७८). सु. दहा वर्षे त्यांनी या साप्ताहिकात अत्यंत आत्मीयतेने काम केले आणि त्याचा खप व दर्जा वाढविला.

या काळात मथुरा सिरूर या युवतीशी ते विवाहबद्ध झाले आणि त्यांनी कायद्याचा अभ्यास करून वकिलीस सुरुवात केली. यशस्वी कायदेपंडित म्हणून त्यांनी लवकरच नावलौकिक मिळविला. इंग्लंडच्या जनमताचा कानोसा घेण्याकरिता ते त्रिसदस्य आयोगातून १८८५ मध्ये इंग्लंडच्या दौऱ्यावर गेले. त्यांच्या कार्याबद्दल फिरोजशाह मेहतांनी प्रशंसोद्गार काढले. त्याच वर्षी काँग्रेसची स्थापना झाली, त्याचे ते आजीव सभासद झाले. १९०० मध्ये ते लाहोर येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते. १८९६ पासूनच ते प्रार्थना समाजाचे प्रमुख होते आणि १९०१ मध्ये सोशल कॉन्फरन्सचे प्रमुख सचिव झाले. या दोन्ही पदांवरून त्यांनी महत्त्वाच्या सामाजिक सुधारणा पुरस्कारिल्या. स्त्रिया व मागास वर्ग यांच्या उद्धाराकरिता त्यांना राजकीय हक्क दिले पाहिजेत, हे मत त्यांनी प्रतिपादिले. याकरिता ते १९०६ मध्ये कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांच्या ‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन’ चे अध्यक्ष झाले.

त्यांच्या कायदेविषयक अभ्यासामुळे त्यांना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नेमण्यात आले (१९०१—१२). त्यानंतर ते काही दिवस इंदूर संस्थानचे मुख्य मंत्री होते. या काळात ते सक्रिय राजकारणापासून अलिप्त राहिले. पण १९१४ नंतर ते पुन्हा राजकारणात पडले आणि १९१९ च्या कायद्यानुसार मुंबईस जी विधानपरिषद स्थापन झाली, तिचे ते बिनसरकारी अध्यक्ष झाले आणि अखेरपर्यंत त्याच पदावर होते. याशिवाय मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू, रॉयल एशियाटिक सोसायटीचे (मुंबई शाखा) अध्यक्ष वगैरे पदे त्यांनी भूषविली. तत्कालीन राजकारणात एक स्पष्ट वक्ता, तळमळीचा कार्यकर्ता व विद्वान कायदेपटू म्हणून त्यांची ख्याती होती. तेलंग, रानडे, भांडारकर प्रभृतींनी घातलेल्या परंपरेचे ते निष्ठावान अनुयायी होते. ते बंगलोर येथे त्यांचे निधन झाले.

१९२३: कायदेपंडित, समाजसुधारक सर नारायण गणेश चंदावरकर यांचे निधन. (जन्म: २ डिसेंबर १८५५ – होन्नावर, उत्तर कन्नडा, कर्नाटक)

मृणाल सेन – मूळ नाव माणिकबाबू, पण ‘मृणालदा’ या नावानेच ते चित्रपटसृष्टीत ओळखले जात असत.

शासकीय अनुदानातून कमी खर्चात बनविलेल्या भुवन शोम (१९६९) या हिंदी चित्रपटाने त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर मानाचे स्थान मिळवून दिले. मृणाल सेन यांचे नेटके कलात्मक दिग्दर्शन, उत्पल दत्त व सुहासिनी मुळ्ये यांचा प्रमुख भूमिकांतला उत्कृष्ट अभिनय, हलकाफुलका निरागस विनोद, अर्थगर्भ संहिता, अमिताभ बच्चन यांनी सूत्रधार म्हणून दिलेला उसना आवाज अशा अनेक गुणवैशिष्ट्यांमुळे हा चित्रपट भारतीय सिनेसृष्टीत युगप्रवर्तक ठरला. ह्या चित्रपटापासून भारतातील वास्तवदर्शी चित्रपटचळवळीला चालना मिळाली, तसेच सेन यांच्या कारकीर्दीला नवे वळण लाभले.

पुढील काळात सेन यांनी राजकीय पार्श्वभूमी असलेले सामाजिक आशयाचे चित्रपट बनविण्यास सुरुवात केली. त्यामुळे मार्क्सवादी कलावंत अशी त्यांची ख्याती झाली.

या काळातील कोलकात्यामधील राजकीय अस्थिरतेस व अनागोंदीच्या स्थितीस मध्यमवर्गीय समाजाची उदासीन, निष्क्रिय वृत्ती कारणीभूत असल्याची त्यांची भूमिका होती. त्याचे प्रभावी दर्शन त्यांनी कोलकाता शहरावरील शोकात्म चित्रपटांतून घडवले. उदा., इंटरव्ह्यू (१९७१), कोलकाता ७१ (१९७२) आणि पदातिक (द गूरिला फायटर, १९७३) इत्यादी. हे चित्रपट व त्यांमागील त्यांची मध्यमवर्गीय समाजाला दोषी ठरवण्याची भूमिका त्या काळात काहीशी वादग्रस्त ठरली. १९७९ नंतर त्यांच्या चित्रपटाचा रोख बदलला. चित्रपटातील सामाजिक वास्तवाच्या चित्रणाऐवजी मानवी अंतर्मनाच्या चित्रणाकडे ते वळले. आपल्या एकूण कारकीर्दीत त्यांनी सु. ३० चित्रपटांचे दिग्दर्शन केले आणि १४ लघुपट व ५ अनुबोधपट निर्माण केले.

मृणाल सेन यांच्या अनेक चित्रपटांना आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांमध्ये विविध पारितोषिके मिळाली. कान्स, बर्लिन, व्हेनिस, मॉस्को, कार्लोव्ही व्हेरी, माँट्रिऑल, शिकागो, कैरो इ. चित्रपटमहोत्सवांतून त्यांचे चित्रपट गौरविण्यात आले. भुवन शोम, इक दिन प्रतिदिन आणि अकालेर सान्धने (इन सर्च ऑफ फॅमिन, १९८०) या चित्रपटांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाची पारितोषिके मिळाली. तसेच भारत सरकारतर्फे पद्मभूषण (१९८१), पद्मविभूषण, भारतीय चित्रपटसृष्टीतील दादासाहेब फाळके हा सर्वोच्च पुरस्कार (२००५) हे त्यांना लाभलेले अन्य पुरस्कार होत. ते संसदेच्या सभागृहाचे सन्माननीय सदस्यही होते (१९९८–२००३).

फ्रान्स सरकारने त्यांना ‘कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स’ या फ्रान्समधील सर्वोच्च पुरस्काराने गौरविले (१९८५). रशियन सरकारनेही ‘ऑर्डर ऑफ फ्रेंडशिप’ या किताबाने त्यांना सन्मानित केले (२००१). अनेक विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट ही मानद पदवी बहाल केली. त्यांना विविध आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांतून जीवन गौरव पुरस्कार देण्यात आले (२००८, २००९, २०१२).

मृणाल सेन यांनी अनेक पुस्तकांचे लेखन केले. त्यात व्ह्यूज ऑन सिनेमा (१९७७), इन सर्च ऑफ फॅमिन (१९८३), द अबसेन्स ट्रिलॉजी (१९९९), मॉन्टेज : लाईफ, पॉलिटिक्स, सिनेमा (२००२), माय चॅप्लिन (२०१३) यांचा समावेश आहे. त्यांनी ऑलवेज बीइंग बॉर्न हे आत्मचरित्र लिहिले (२००४)

१९२३: पद्मभूषण पुरस्कार सन्मानित दिग्दर्शक मृणाल सेन यांचा जन्म. (मृत्यू: ३० डिसेंबर, २०१८ )

  • घटना :
    १७९६: इंग्लंडच्या ग्लूस्टर परगण्यातील बर्कले येथील जेम्स फिलीप या आठ वर्षाच्या मुलाला जगातील पहिली देवीची लस टोचण्यात आली.
    १९४०: दुसरे महायुद्ध – हॉलंडने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
    १९५५: सोविएत रशिया, अल्बानिया, बल्गेरिया, झेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, पोलंड, रुमानिया आणि पूर्व जर्मनी या कम्युनिस्ट राष्ट्रांचा वीस वर्षांचा परस्पर संरक्षणासाठीचा वॉर्सा करार पोलंडमधील वॉर्सा येथे झाला.
    १९६०: एअर इंडिया ची मुंबई – न्यूयॉर्क विमानसेवा सुरू झाली.
    १९६३: कुवेतचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश.
    १९६५ चीनने सकाळी साडे सात वाजता (भारतीय वेळ) आपल्या दुसर्या अणुबॉम्बचा यशस्वी स्फोट केला.
    १९९७: देशातील आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला सहकारी साखर कारखान्याची साखर आयुक्त कार्यालयात सहकार कायदा कलम चारखाली नोंदणी झाली. इंदिरा गांधी भारतीय महिला विकास सहकारी साखर कारखाना असे त्याचे नाव आहे.

• मृत्यू :

१९६३: भाषाशास्त्रज्ञ, जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, घटनासमितीचे सदस्य, राज्यसभा खासदार डॉ. रघू वीरा यांचे मोटार अपघातात निधन झाले. (जन्म: ३० डिसेंबर १९०२)
१९७८: नाटककार व लेखक जगदीश चंद्र माथूर यांचे निधन. (जन्म: १६ जुलै१९१७)
२०१२: रसनाच्या जाहिरातीतील बालकलाकार तरुणी सचदेव यांचे निधन.
२०१३: भारतीय लेखक असगर अली इंजिनिअर यांचे निधन. (जन्म: १० मार्च१९३९)

  • जन्म :
    १९०९: विनोदसम्राट, कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित वसंत शिंदे यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै १९९९)
    १९२६: आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका डॉ. इंदुताई पटवर्धन यांचा जन्म. (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९९९)
    १९८१: भारतीय संगणक शास्त्रज्ञ प्रणव मिस्त्री यांचा जन्म.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »