‘संत तुकाराम’ ची निवडणूक लागली, ५ एप्रिल रोजी मतदान

पुणे : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. ५ एप्रिलला मतदान होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी दिली.
या निवडणुकीसाठी ३ ते ७ मार्चपर्यंत साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे येथे उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृती होणार आहे. प्राप्त उमेदवारी अर्जांच्या छाननीची प्रक्रिया त्याच ठिकाणी १० मार्च रोजी सकाळी ११ वाजल्यापासून छाननी कामकाज संपेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
तसेच, उमदवारी अर्ज मागे घेण्यासाठी २५ मार्चपर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे. त्यानंतर २६ मार्च रोजी अंतिम नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध करणे व पात्र उमेदवारांना निशाणी (निवडणूक चिन्ह) वाटपाची कार्यवाही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात करण्यात येणार आहे. ५ एप्रिल रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान प्रक्रिया घेण्यात येणार असून, मतमोजणी ६ एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पवार यांनी दिली.
मतदारसंघ व संचालक संख्या पुढीलप्रमाणे: व्यक्ती उत्पादक सभासद गट नंबर १ हिंजवडी-ताथवडे (संचालक संख्या ३), गट नंबर २ पौड-पिरंगुट (संचालक संख्या ३), गट नंबर ३ तळेगाव-वडगाव (संचालक संख्या ३) गट नंबर ४ सोमाटणे-पवनानगर (संचालक संख्या ३), गट नंबर ५ खेड-हवेली-शिरूर (संचालक संख्या ४), अनुसूचित जाती/जमाती (संचालक संख्या १), महिला राखीव प्रतिनिधी (संचालक संख्या २), इतर मागासवगीय प्रतिनिधी (संचालक संख्या १), विमुक्त जाती, भटक्या जमाती वे विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी (संचालक संख्या १)
मावळ, मुळशी, हवेली, खेड व शिरूर अशा पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या श्री संत तुकाराम साखर कारखान्यात एकूण २२ हजार २५८ मतदारसंख्या असून, २१ संचालक आहेत.