संत तुकाराम कारखाना निवडणूक : दाभाडेंची याचिका फेटाळली

पुणे : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या सभासद मतदार यादीबाबत संचालक माऊली दाभाडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली हरकत घेत याचिका न्यायालयाने फेटाळल्याने, कारखान्याच्या पंचवार्षिक निवणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
या निर्णयामुळे जिल्हा सहकारी निवडणूक प्राधिकरणाने संत तुकाराम कारखान्याच्या संचालक निवडीसाठी तयार केलेल्या मतदार यादीला आता अंतिम स्वरूप आले आहे. मुळशी, मावळ, खेड, हवेली आणि शिरूर या पाच तालुक्यात श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. पाचही तालुक्यात या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात २२ हजार ९१७ सभासद आहेत.
गतवर्षी ३१ डिसेंबरला या कारखान्याच्या संचालकांच्या पंचवार्षिक निवडीचा कालावधी संपला होता. परंतु, शासनाकडून निवडणुका पुढे ढकलण्याचे आदेश दिले होते. तर ६ जानेवारीला निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार जिल्हा सहकारी निवडणूक प्राधिकरण तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी १७ जानेवारीला कारखान्याची प्रारूप सभासद यादी तयार केली. त्याला हरकत घेणारी याचिका दाभाडे यांनी दाखल केली होती.