कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत व्हीएसआयमध्ये बैठक

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या साखर संकुल येथील कार्यालयामध्ये अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत, परवा एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीत संस्थेच्या विविध संशोधन उपक्रमांचा, ऊस उत्पादन व संवर्धन, नवीन ऊस जातींचा विकास, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ऊस शेती प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यासोबतच संशोधन, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांवरही चर्चा करण्यात आली.

या बैठकीस संस्थेचे विश्वस्त विजयसिंह मोहिते-पाटील, जयंत पाटील, जयप्रकाश दांडेगावकर, बाळासाहेब थोरात, बाळासाहेब पाटील, डॉ. इंद्रजीत मोहिते, हर्षवर्धन पाटील, श्रीरंग शेटे, अशोक पवार, युगेंद्र पवार, साखर आयुक्त संजय कोलते तसेच संस्थेचे महासंचालक संभाजी कडू-पाटील यांच्यासह संस्थेच्या विविध विभागांचे प्रमुख, शास्त्रज्ञ आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »