संत शिरोमणी कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पाचे भूमिपूजन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

लातूर : संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखाना लि. बेलकुड यांच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या ४५ केएलपीडी आसवानी (डिस्टिलरी) प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभ माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार अभिमन्यू काळे यांच्या हस्ते झाला. तसेच यावेळी सन २०२६ – २७ या हंगामाचे रोलर पूजन करण्यात आले.

डिस्टिलरी प्रकल्पाच्या उभारणीमुळे साखर उद्योगाला बळकटी देण्याबरोबरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक मूल्य मिळवून देणे, उपउत्पादनांचा प्रभावी वापर करणे, स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, असे आ. पवार म्हणाले.

कारखान्याचे अध्यक्ष, संचालक मंडळ, सभासद आणि शेतकरी बांधवांचे अभिनंदन करत त्यांना आ. पवार यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रसंगी महाराष्ट्र राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन प्रमोद आबा जाधव, व्हॉइस चेअरमन प्रवीण पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष देशमुख, सभापती चंद्रशेखर सोनवणे, उपसभापती भीमाशंकर राचटे, जिल्हा परिषद सदस्य सुभाष दाजी पवार, संदिपान शेळके, शालिनीताई चव्हाण, सईताई गोरे, सचिन दाताळ, नारायण आबा लोखंडे, उदयसिंह देशमुख, शिवाजी पाटील, सुनील उटगे, चेअरमन शाम भोसले, व्हाईस चेअरमन सचिन पाटील, संचालक गणपती बाजुलगे, शामराव साळुंखे, सुभाषराव जाधव, रमेश वळके, ॲड बाबासाहेब गायकवाड, गोविंद सोनटक्के, विलास काळे, संतोष भोसले, अनिल पाटील, निवेदिताताई पाटील, शुभांगीताई बिराजदार, पी.सी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »