राज्यातील एफआरपी थकबाकीचा आकडा 201 कोटींवर

15 कारखान्यांवर कारवाई करूनही वसुली नाही
पुणे : राज्यातील ३२ साखर कारखान्यांनी मागील हंगामात घेतलेल्या उसाचे २०१ कोटी रुपये शेतकऱ्यांना अद्याप दिले नाहीत. त्यामध्ये मागील गाळप हंगामातील एफआरपी थकविलेल्या १५ साखर कारखान्यांवर आरआरसी कारवाई करूनही फरक झालेला नाही. गत ऊस गाळप हंगामात राज्यातील २०० साखर कारखान्ये सुरू झाले होते.
काही साखर कारखानेचे बंद होऊन सहा तर काहींचे पाच महिने झाले आहेत. काही कारखाने बंद होऊन सात महिन्यांचा कालावधी झाला आहे. साखर कारखाने बंद झाल्यापासून शेतकरी ऊस उत्पादक पैशासाठी तिष्ठत असले तरी साखर कारखानदार लक्ष देत नाहीत.
राज्यातील ३२ साखर कारखान्यांनी मागील हंगामात आणलेल्या उसाचे २०१ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले नाहीत. जिल्ह्यातील व राज्यातील इतर साखर कारखाने एफआरपीपेक्षा अधिक पैसे चुकते करून पुढच्या हंगामाची तयारी करीत असताना मागील वर्षीची एफआरपी देऊ न शकलेले ३२ व अन्य कारखाने आहेत. विशेष म्हणजे एफआरपी थकविलेल्या १५ साखर कारखान्यांवर आरआरसी कारवाई केली असली तरी कारखानदार जुमानत नसल्याचे दिसत आहे.






