श्री रेणुका शुगर्समध्ये विविध पदांसाठी भरती

अथणी : श्री रेणुका शुगर्स लिमिटेडच्या युनिट क्रमांक-४, कोकटनूर (ता. अथणी, जि. बेळगावी) येथील साखर, वीज निर्मिती व डिस्टिलरी प्रकल्पासाठी विविध पदांवर भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पात्र व अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
उमेदवारीसाठी प्रमुख पदे :
- मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट – २ पदे
- लॅब केमिस्ट – १ पद
- गोडाऊन सुपरवायझर – १ पद
- ज्यूस सुपरवायझर – १ पद
- C/F बॅच मशीन ऑपरेटर – २ पदे
- असिस्टंट पॅनमन – २ पदे
- क्लॅरिफिकेशन ऑपरेटर – २ पदे
- प्रोसेस ऑपरेटर – २ पदे
- फिटर, वेल्डर व बॉयलर अटेंडंट
- असिस्टंट मॅनेजर (डिस्टिलरी), शिफ्ट केमिस्ट, असिस्टंट इंजिनिअर
- ज्युनिअर शिफ्ट केमिस्ट, प्रोसेस केमिस्ट व डिस्टिलेशन प्लांट ऑपरेटर
- केन ऑफिसर व केन सुपरवायझर
पदानुसार SSLC/PUC/ITI, B.Sc./M.Sc., कृषी पदवी, बी.ई. मेकॅनिकल तसेच संबंधित तांत्रिक पात्रता आवश्यक आहे. विविध पदांसाठी साधारण ४ ते १२ वर्षांचा अनुभव अपेक्षित आहे. साखर कारखाना व को-जनरेशन क्षेत्रातील अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
अर्जाची अंतिम तारीख : १५ सप्टेंबर २०२६
उमेदवारांनी आपला अद्ययावत बायोडाटा, शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे तसेच आधार कार्ड व पॅन कार्डची कागदपत्रे सादर करावीत. पात्र उमेदवारांनी rajakumar.adahalli@renukasugars.com/ personnel.athani@renukasugars.com या ई-मेलवर आपला बायोडाटा पाठवावा.
ठिकाण : श्री रेणुका शुगर्स लिमिटेड, युनिट-४, कोकटनूर, ता. अथणी, जि. बेळगावी.




