गळा आवळून पत्नीचा खून; ऊसतोडीला जाण्यावरून उचलले टोकाचे पाऊल

आवडल्यास ही बातमी शेअर करा

नांदेड : ऊसतोडीसाठी जाण्याच्या कारणावरून भोकर शहरातील एका दाम्पत्यामध्ये जोरदार वाद झाला. यामध्ये पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना शहरातील बटाळा रोड परिसरात गुरुवारी (दि .३ सप्टेंबर) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

ममता हनुमंत भोसले (वय ३१, रा. भोकर) असे मृत महिलेचे नाव असून, हनुमंत रमेश भोसले (वय ३५) असे आरोपी पतीचे नाव आहे. ऊसतोडीला जाण्याच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. वाद वाढल्यानंतर हनुमंत भोसले याने दोरीच्या साहाय्याने पत्नी ममता हिचा गळा आवळला. यात तिचा मृत्यू झाला.

या प्रकरणी सोसलाल जीवन चव्हाण (वय ३५, रा. साईनगर, पिटलवाडा मंडळ, जि. आदिलाबाद) यांनी फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून, त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणी मयत ममता भोसले यांच्या पतीच्या विरोधात भोकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »