किसन वीर कारखान्यात उन्हाळी कुस्ती शिबिर!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

भुईंज : किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या साई (स्पोर्टस् ऑथॉरिटी ऑफ डंडिया) केंद्रात यंदाही उन्हाळी निवासी कुस्ती शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर २५ एप्रिल ते १९ मे या कालावधीत पार पडणार असून, १० ते १७ वर्षे वयोगटातील मुलांना प्रवेश दिला जाणार आहे.

कारखान्याचे व्हाइस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे शिबिर कारखाना कार्यक्षेत्रातील तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आहे. प्रवेशासाठी इच्छुकांनी २४ एप्रिलपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

तीन वर्षांपूर्वी कारखान्याचे चेअरमन व राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि जिल्हा बँकेचे चेअरमन खासदार नितीन पाटील यांच्या पुढाकाराने हे शिबिर नव्या स्वरूपात सुरू झाले. गेल्या तीन वर्षांतील उत्साहवर्धक प्रतिसाद पाहता यंदाही शिबिर घेण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.

शिबिराची फी ₹७५०० असून त्यामध्ये निवास, भोजन, दूध, नाश्ता व फलाहाराची सोय केली जाणार आहे. प्रशिक्षणानंतर सहभागी मुलांना टी-शर्ट, शॉर्ट्स व शूज देण्यात येतील. कुस्ती क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ व शासकीय मार्गदर्शक दत्ता माने हे प्रशिक्षण देणार असून, योगाचेही मार्गदर्शन केले जाणार आहे.

या शिबिरात प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्याने १०० मुलांना प्रवेश दिला जाणार आहे. सहभागी मुलांनी दैनंदिन वापराच्या वस्तू व बिछाना सोबत आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी कुस्ती मार्गदर्शक राजेंद्र कणसे यांच्याशी संपर्क साधावा, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »