उदगिरी शुगरची परंपरा कायम : शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा अधिक रक्कम

पुणे : सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील महनीय व्यक्तिमत्त्व डॉ. शिवाजीराव कदम यांनी स्थापन केलेल्या उदगिरी शुगर अँड पॉवर लि. ने शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा अधिक रक्कम देण्याची परंपरा यंदाही कायम राखली आहे. (एफआरपी म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कायद्याने देय असलेली रक्कम)
बामणी पारे (जि. सांगली) येथील उदगिरी शुगर हा साखर कारखाना चेअरमन डॉ. राहुल शिवाजीराव कदम यांच्या नेतृत्वाखाली यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करत आहे; मात्र त्याचबरोबर कारखान्याची शेतकरी आणि समाजाप्रति असलेली बांधिलकीदेखील वरचेवर अधिक घट्ट होत आहे.
उदगिरी शुगरने यंदा पाच लाख टनांपेक्षा अधिक ऊस गाळप केले आहे. तसेच सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिले वेळेआधी अदा तर केलीच, शिवाय एफआरपीनुसार देय असलेल्या रकमेपेक्षा सुमारे ८९६ लाख रू. अधिक दिले आहेत.
उदगिरी शुगरने आजपर्यंत सीएसआर अंतर्गत अनेक व्यक्ती आणि संस्थांना भरीव मदत केली आहे.






