या 63 कारखान्यांचे अभिनंदन… शेतकऱ्यांना दिली एफआरपीपेक्षा अधिक रक्कम (Full Report)

SupgarToday Special Report
पुणे : महाराष्ट्रातील साखर हंगाम २०२५-२६ मध्ये राज्यातील एकूण २०९ साखर कारखान्यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत १,०४२.२७ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले. साखर आयुक्तालयाने १५ एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाक्षिक अहवालानुसार, राज्यात एकूण ₹२,१३० कोटींची एफआरपी (उचित व किफायतशीर किंमत) थकबाकी असून ११७ कारखान्यांवर कमी-अधिक प्रमाणात देणी बाकी आहेत. मात्र ६3 साखर कारखान्यांनी एफआरपी पेक्षा अधिक रक्कम देऊन शेतकऱ्यांचे आशीर्वाद घेतले आहेत.
थकबाकीचे चित्र गंभीर
राज्याचे एकूण सकल एफआरपी देय ₹४०,३२७ कोटी असताना प्रत्यक्षात ₹३८,१९७ कोटी भरणा झाला आहे. वास्तविक भरण्याची टक्केवारी ९४.७२% आहे. मात्र, ५ कारखान्यांनी ५०% पेक्षाही कमी एफआरपी दिल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
सर्वाधिक थकबाकीदार कारखाने (५०% पेक्षा कमी भरणा) :
| कारखाना | जिल्हा | एफआरपी भरणा | थकबाकी |
|---|---|---|---|
| श्री संत कुर्मदास सह.सा. कारखाना | सोलापूर | ३०.००% | ₹२३.४० कोटी |
| श्री तुळजाभवानी शुगर लि., आडगाव, सेलू | परभणी | ३१.१४% | ₹१८.१० कोटी |
| भीमा सह.सा.का, लि., टाकळी सिकंदर | सोलापूर | ३९.०८% | ₹३०.३७ कोटी |
| एस.जे. शुगर डिस्टिलरी अँड पॉवर प्रा.लि. | नाशिक | ४४.८५% | ₹१.९३ कोटी |
| किसनवीर सातारा सह.सा.का. लि., वाई | सातारा | ४७.६२% | ₹७५.२७ कोटी |
किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याने सर्वाधिक ₹७५.२७ कोटी थकबाकी ठेवली असून सोलापूर जिल्ह्यातील दोन सहकारी कारखान्यांची स्थितीही चिंताजनक आहे. विशेष म्हणजे या कारखान्याचे चेअरमन मंत्रीमहोदय आहेत.
६3 कारखान्यांची शेतकऱ्यांप्रती उदारता
थकबाकीच्या गंभीर चित्राच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील ६१ साखर कारखान्यांनी कायद्यानुसार देय एफआरपीपेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे, ही समाधानाची बाब आहे.
सर्वाधिक अतिरिक्त रक्कम देणारे अव्वल ५ कारखाने :
| कारखाना | जिल्हा | अतिरिक्त रक्कम |
|---|---|---|
| निरा-भीमा सह. सा. कारखाना लि., ताल. इंदापूर | पुणे | ₹७७.६४ कोटी |
| पंचगंगा शुगर अँड पॉवर प्रा.लि., महालगाव | संभाजीनगर | ₹२९.२७ कोटी |
| सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील एसएसके, अक्कलकोट | सोलापूर | ₹२०.८५ कोटी |
| शरयू अॅग्रो इंडस्ट्रीज लि., कपाशी, फलटण | सातारा | ₹१९.५६ कोटी |
| खटाव मन तालुका अॅग्रो प्रोसेसिंग लि., पडळ | सातारा | ₹१७.७० कोटी |
पुणे जिल्ह्यातील निरा-भीमा सह. साखर कारखान्याने देय रकमेपेक्षब्ब तब्बल ₹७७.६४ कोटी जास्त शेतकऱ्यांना दिले असून हे राज्यात सर्वोच्च आहे.
जिल्हानिहाय स्थिती
अतिरिक्त एफआरपी देणाऱ्या ६१ कारखान्यांमध्ये कोल्हापूर (१३), सोलापूर (१०), सातारा (९), पुणे (९) व अहिल्यानगर (७) या जिल्ह्यांचा आघाडीवर समावेश आहे.
शेतकरी संघटनांची मागणी
राज्य सरकारने थकबाकीदार कारखान्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. ऊस नियंत्रण कायद्यानुसार एफआरपी वेळेत न दिल्यास संबंधित कारखान्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार साखर आयुक्तांना आहेत.
या कारखान्यांचे अभिनंदन
एफआरपीपेक्षा अधिक रक्कम दिलेले साखर कारखाने — हंगाम २०२५-२६ (१५.०४.२०२६)
एफआरपीपेक्षा अधिक दिलेले कारखाने
—
सर्वाधिक अतिरिक्त रक्कम
₹7,764 लाख
एकूण अतिरिक्त रक्कम (लाख)
—
अहवाल तारीख
१५.०४.२०२६
| क्र. | कारखान्याचे नाव | जिल्हा | प्रकार | अतिरिक्त रक्कम (लाख रु.) | एफआरपी स्थिती |
|---|
(टीप : हा रिपोर्ट खूप मोठा असल्याने चार्ट तपशील पाहण्यासाठी आपला मोबाईल कृपया आडवा धरावा)





