विठ्ठलराव शिंदे कारखाना युनिट 2 च्या गाळप हंगामाची सांगता

सोलापूर : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.2 करकंब येथील सन 2022-23 ऊस गळीत हंगामाचा सांगता समारंभ व साखर पोती पुजन मंगळवार दि.07 मार्च,2023 रोजी सकाळी व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे व संचालक तथा सभापती विक्रमसिंह शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
सदर प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना व्हाईस चेअरमन म्हणाले की, कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब या कारखान्याची घौडदौड वेगाने सुरू असून या गळीत हंगामात दोन्ही युनिटकडे दि.28 फेब्रुवारी अखेर गाळपास आलेल्या ऊसास जाहीर अनुदानासह ऊस बिल पेमेंट ऊस पुरवठादारांना अदा केलेले आहे. आ.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची चौफेर प्रगती होत असून कारखान्याने सातत्याने सभासद, ऊस पुरवठादार यांचे हीत जोपासलेले आहे.
सभासद, ऊस पुरवठादार, कंत्राटदार, कामगार यांच्या सहकार्याने सन 2022-23 ऊस गाळप हंगाम यशस्वीपणे पार पडलेला असून त्यांचे आभार मानून भविष्यात देखील सर्वांनी असेच सहकार्य करावे असे आवाहन वामनराव उबाळे यांनी केले. तसेच या गळीत हंगामात उत्पादीत 5 लाख 22 हजार 550 क्विंटल साखर पोत्याचे पुजन कारखान्याचे संचालक तथा सभापती विक्रमसिंह शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.2 करकंब येथील सन 2022-23 ऊस गाळप हंगाम दि.19/10/2022 रोजी सुरू झालेला होता. या गळीत हंगामात आजअखेर कारखान्याने 5 लाख 28 हजार मे.टन गाळप केले आहे. तसेच सहविजनिर्मिती प्रकल्पातून 2 कोटी 46 लाख 33 हजार युनिट वीज विद्युत महामंडळाला निर्यात करण्यात आली आहे.
सदरप्रसंगी कारखान्याचे संचालक रमेश येवलेपाटील, प्रभाकर कुटे, लक्ष्मण खुपसे, वेताळ जाधव, पोपट चव्हाण, पांडूरंग घाडगे, लाला मोरे, सचिन देशमुख,नरसाप्पा देशमुख, समाधान नरसाळे, मदने सरपंच,अजितसिंह देशमुख, कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे, युनिट नं.2 चे जनरल मॅनेजर सुहास यादव, जनरल मॅनेजर (प्रोसेस)पोपट येलपले, चिफ इंजिनिअर सुनिल महामुनी, चिफ केमिस्ट बाळासो साळुंखे, शेती अधिकारी बाबुराव इंगवले, हेड टाईम किपर तानाजी लोंढे, स्टोअर किपर नितिन देशमुख व इतर मान्यवर तथा सभासद, ऊस पुरवठादार कंत्राटदार, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.