नियुक्ती : ‘व्हीएसआय’ला पाहिजेत कृषी सहाय्यक

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट अर्थात ‘व्हीएसआय’ला पाच कृषी सहाय्यक नियुक्त करायचे असून, त्यासाठी ३१ जानेवारी २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहेत. ही पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत, त्यासाठी दरमहा रू. २५ हजार (एकत्रित) वेतन दिले जाणार आहे.

या पदासाठी वयोमर्यादा ३० वर्षे असून, दोन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा….

Advt. Agri. Assistant (05 Posts)-9.1.25.pdf

अल्कोहोल टेक्नॉलॉजिस्ट आणि सायंटिफिक ऑफिसर

ही दोन्ही पदेदेखील व्हीएसआय भरणार आहे. सायंटिफिक ऑफिसर पदासाठी ३५ ते ४० हजार रुपये वेतन असून, एमएस्सी पदवी शिक्षणाची अट आहे.

तसेच अल्कोहोल टेक्नॉलॉजिस्ट या पदासाठी ७० ते ८० हजार रुपये वेतन दिले जाणार आहे. ही दोन्ही पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत. अधिक तपशीलासाठी खालील लिंक पाहा.

Alcohol Technologist (01 Post)-15.01.25.pdf

Sci. Officer(01 Post)-Readvt. 21.01.25.pdf

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »