ऊसतोडीच्या वादातून महिलांवर कोयत्याने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सांगली : कोळे-नरसिंहपूर (ता. वाळवा) येथे गहाणखरेदी खत केलेल्या शेतातील ऊस तोडण्यावरून झालेल्या वादात दोन महिलांवर कोयत्याने वार करून त्यांना जखमी करण्यात आले.

या प्रकरणी ईश्वरपूर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपाली अनिल मंडले या संबंधित शेतातील ऊस तोडण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी संशयित रमेश कांबळे यांनी त्यांना अडवले. त्यानंतर संगीता कांबळे यांनी सुप्रिया मंडले यांच्या डाव्या हातावर, तर नीलम कांबळे यांनी मंगल मंडले यांच्या उजव्या हातावर कोयत्याने वार केल्याचा आरोप आहे.

रुपाली मंडले यांच्या फिर्यादीवरून रमेश राजाराम कांबळे, संगीता राजाराम कांबळे आणि नीलम रमेश कांबळे या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »