आजचे पंचांग

शुक्रवार, जून २४, २०२२
युगाब्द : ५१२४
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर आषाढ ३ शके १९४४
सूर्योदय : ०६:०३ सूर्यास्त : १९:१९
चंद्रोदय : ०३:०२, जून २५ चंद्रास्त : १५:२५
शक सम्वत : १९४४
संवत्सर : शुभकृत्
उत्तरायण
ऋतू : ग्रीष्म
चंद्र माह : ज्येष्ठ
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : योगिनी एकादशी – २३:१२ पर्यंत
नक्षत्र : अश्विनी – ०८:०४ पर्यंत
योग : सुकर्मा – ०५:१४, जून २५ पर्यंत
करण : बव – १०:२२ पर्यंत
द्वितीय करण : बालव – २३:१२ पर्यंत
सूर्य राशि : मिथुन
चंद्र राशि : मेष
राहुकाल : ११:०१ ते १२:४१
गुलिक काल : ०७:४२ ते ०९:२२
यमगण्ड : १६:०० ते १७:४०
अभिजित मुहूर्त : १२:१४ ते १३:०७
दुर्मुहूर्त : ०८:४२ ते ०९:३५
दुर्मुहूर्त : १३:०७ ते १४:०१
‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’
रुसलासी तू का दत्ता । तुजवरी रुसलो आता ।।१।।
हाक न ऐकली माझी । नायके मी बोली तुझी ।।२।।
का न पहिले मला । न पाहीन आता तुला ।।३।।
का उपेक्षिले मला । आता उपेक्षु की तुला ।।४।।
वासुदेव रुसला दत्ता । समजावी त्याच्या चि त्ता ।।५।।
परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामीमहाराज यांचा हा विश्वशांतीमंत्र जगाला देवून त्यांनी लोकमंगल, लोककल्याणकारी वाङ्मय लिहिले. हे वाङ्मय या काळामधील एक चमत्कारच आहे. भारतीय तत्त्वज्ञान व वाङ्मय यामध्ये स्वामीमहाराजांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यांच्या वाङ्मयावर महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजराथ या प्रांतातील अभ्यासकांनी प्रबंध तयार करून त्या त्या विद्यापीठातून मान्यता मिळवलेली आहे. आजच्या विज्ञान युगात मानव हा एक यंत्र बनू लागला आहे. शाश्वत चिरंतन मूल्याची अवहेलना होत आहे.
वैज्ञानिक प्रगती कितीही झाली तरी मानसिक दौर्बल्य वाढत चाललेले आहे. वरवर सुखी समाधानी, दिसणारा समाज अंतर्यामी दु:खी, खिन्न, उदासीन आहे. या दोन्ही गोष्टीतील तफावत कशी कमी होणार? अशा प्रश्नांची उत्तरे म्हणजे स्वामी महाराजांचे जीवन चरित्र व वाङ्मय आहे. भौतिक प्रगती बरोबरच शाश्वत चिरंतन मूल्याचा ठेवा आपण प्राणपणाने जपला पाहिजे असे त्यांचे वाङ्मय सांगते.
• १९१४ : वासुदेव गणेश टेंबे उर्फ टेंबे स्वामी किंवा वासुदेवानंद सरस्वती यांचा गरुडेश्वर, बडोदा, गुजरात येथे यांनी देह त्याग केला (तारखेप्रमाणे)
प्रचंड ताकदीचे गायक संगीतकार पंडीत औंकारनाथ ठाकूर – वडिलांकडून मिळालेली प्रणव साधना , धर्माबद्दल आस्था व संकटांना तोंड देण्याची वृत्ती, ह्या सगळ्या गोष्टी. तसेच वडिलांपुढे जाऊन ” नाद उपासना ” किंवा ” अज्ञाताची संगीतातून केलेली भक्ती ओंकारनाथजींमध्ये ठासून भरलेली होती.
त्यांचे वडिलांनी घेतलेला संन्यास व आईच्या कमाईतून घर खर्च भागत नव्हता अशा वेळी त्यांची अवस्था एका कात्रित सापडल्या सारखी झाली. बालपण अतिशय खडतर असे गेले. पायपीट करून वकिलाच्या घरी आचारी काम सुध्दा केले. एका कापड गिरणीत सुध्दा त्यांनी मजूर म्हणून प्रसंगी काम केले. त्यांचे आई , भावंड, यांना त्यांचे काकांनी त्यांना घराबाहेर सुध्दा काढले. पण संगित साधनेत त्यांनी खंड पडू दिला नाही .
१९२४ साली नेपाळचे राजे महाराज चंद्र समशेर जंग बहादुर यांच्या आमंत्रणावरुन त्यांनी अतिकठीण असा नेपाळ दौरा केला. त्यांना तेव्हा अमाप धन व प्रतिष्ठा मि़ळाली. स्वतः राजाने त्यांना ५००० रु. रोख व अगणित मौलिक अलंकार दिले. ह्याच वेळेस महीना ३००० रु. अशी घसघशीत दरबार गायकाची नोकरीसुद्धा देऊ केली. पण ओंकारनाथजींना घरी परतण्याचे वेध लागलेले. कधी एकदा घरी आईच्या पायावर सगळी संपत्ती घालतो असं त्यांना झालेलं. त्यांच ते कित्येक वर्षे जपलेलं स्वप्न होतं. म्हणुन त्यांनी ती नोकरी धुडकावून लावली.
ह्याच सुमारास ओंकारनाथजींना विविध शास्त्रांचा अभ्यास करण्याचा छंद लागला. शिवाय ते एक सच्चे देशभक्तही होते. ओंकारनाथजींनी भडोच काँग्रेस कमिटी व गुजरात काँग्रेस कमिटी वरही काम केले. दैवाचे आभार मानावे तितके थोडेच की ते तिथे अडकले नाहीत. १९३० साली ओंकारनाथजींना परत नेपाळ दौरा घडला. ह्या वेळेस त्यांनी सगळी संपत्ती गुरु पलुस्करांच्या पायावर अर्पण केली. पलुस्करांचा आनंद गगनात मावेना. ह्यानंतर ओंकारनाथजींचे हैद्राबाद, म्हैसुर व बंगालचे दौरे झाले. हैद्राबादमधे त्यांनी मालकंस रागात अशी काही मैफल जमवली की स्वतः गुरुने पं. पलुस्करांनी त्यांना भर बैठ्कीत मिठी मारली व आपल्या आसवांचा आशीर्वाद दिला.
१९३३ साली जागतिक संगीत संमेलनाचे त्यांना निमंत्रण मिळाले म्हणुन ते इटलीला फ्लॉरेन्समधे गेले. इटलीची त्यांची एक कथा खुप प्रसिद्ध आहे. त्यांनी सरळ जाऊन मुसोलिनीच्या व्यक्तिगत सचिवास मुसोलिनीला फक्त ५ मिनीटे गाणं ऐकवण्याची गळ घातली. केवढं ते धैर्य. पण फक्त ५ मिनीटांच्या बोलीवर तो तयार झाला. तशी मुसोलिनीसाठी त्यांनी ‘तोडी’ गायला. ५ मिनीटांनी ओंकारनाथजी थांबले. तर मुसोलिनीने त्यांना खुणेनेच गात राहायला सांगितले. अर्ध्यातासाने शेवटी सचिवाने गाणं थांबावायची सुचना केली. जाताना मुसोलिनी डोळे पुसत एवढच म्हणाला की ‘ हे संगीत मी पुन्हा ऐकणार नाही. माझं हृदय असं विरघळलेलं चालणार नाही. मी हुकुमशहा आहे. मला कठोरच रहायला हवं. पुन्हा हे संगीत मला ऐकवू नकोस. तुझी बिदागी सन्मानपुर्वक घे. तुझं संगीत चालू राहु दे पण इथे नाही तुझ्या देशात..’.
मंडळी, अशी जादु आहे आपल्या भारतीय अभिजात संगीताची आणि ओंकारनाथजींच्या आवाजाची होती. नंतर ओंकारनाथजींनी संपुर्ण युरोप दौरा केला. त्यांनी शेख अमानुल्ला ह्या अफगाणिस्तानमधल्या राजासमोरही गायन केलं. त्यांच्या मित्रांनी त्यांना लंडनमध्ये असताना किंग जॉर्ज (पाच) ह्याच्यासामोर गायला परवानगी मिळावी म्हणुन प्रार्थना कर असं तेव्हा ओंकारनाथजींनी स्वाभिमान ठेऊन ते साफ धुडकावून लावली. कारण ते एक सच्चे देशभक्तही होते.
१८९७ : पद्मश्री पुरस्कार सन्मानित ग्वाल्हेर घराण्यातील प्रसिद्ध संगीतकार पंडीत औंकारनाथ ठाकूर यांचा जन्म. (मृत्यू : २९ डिसेंबर १९६७)
घटना :
१४४१ : इटन कॉलेजची स्थापना.
१९३९ : सयामचे थायलंड असे नामकरण करण्यात आले.
१९४० : दुसरे महायुद्ध – फ्रान्स व इटलीमधे शस्त्रसंधी झाली.
१९९६ : मायकेल जॉन्सनचा १९.६६ सेकंदांत २०० मीटर धावून विश्वविक्रम.
२००१ : आय. एन. एस. विराट ही भारतीय नौदलाची एकमेव विमानवाहू नौका आधुनिकी करणानंतर पुन्हा नौदलात दाखल झाली.
२०१० : जुलिया गिलार्ड यांनी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला.
• मृत्यू :
• १९४७ : बौद्ध धर्माचे अभ्यासक पंडित धर्मानंद कोसंबी यांचे निधन. (जन्म : ९ ऑक्टोबर १८७६)
• १९९७ : ओडिसी नर्तिका संयुक्ता पाणिग्रही यांचे निधन. (जन्म : २४ ऑगस्ट १९४४)
जन्म :
१८६२ : रविकिरण मंडळाचे संस्थापक श्रीधर बाळकृष्ण रानडे यांचा जन्म. (मृत्यू : २१ मार्च १९७४)
१८७० : चार्ल्स रँड याची हत्या करणारे दामोदर हरी चाफेकर यांचा जन्म. (मृत्यू : १८ एप्रिल १८९८)
१८९९ : मराठी रंगभूमीवरचे नटसम्राट नानासाहेब फाटक यांचा कोल्हापुर येथे जन्म. (मृत्यू : ८ एप्रिल १९७४)
१९०८ : कथकली नर्तक गुरूगोपीनाथ यांचा जन्म. (मृत्यू : ९ ऑक्टोबर १९८७)
१९२७ : तामिळ लेखक कवियरासू कन्नडासन यांचा जन्म.
१९२८ : महाराष्ट्रातील लोकनेत्या मृणाल केशव गोरे यांचा जन्म. (मृत्यू : १७ जुलै२०१२)
१९३७ : ज्येष्ठ लेखिका अनिता मुजूमदार देसाई यांचा मसुरी येथे जन्म.