उसाच्या शेतात बिबट्याची पिल्ले

मंड्या- मध्यप्रदेश : तालुक्यातील मोडचकनहळ्ळी गावात उसाच्या शेतात बिबट्याची तीन पिल्ले आढळून आली आहेत.
ऊसाचे शेत गावातील चेतन यांचे असून मजूर ऊस तोडणी करत असताना तीन पिल्ले आढळून आल्याने त्यांनी तत्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली.
घटनास्थळी पोहोचलेल्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तिन्ही पिल्लांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, माता बिबट्या आपल्या पिल्लांच्या शोधात येणार असल्याचे समजल्याने गावकऱ्यांनी मातृ बिबट्याला पकडून तिच्या पिल्लांसह एकत्र आणण्याची विनंती वन अधिकाऱ्यांकडे केली आहे.