डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्यात विविध पदांसाठी भरती

धाराशिव : केशेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याने आगामी गळीत हंगामासाठी विविध विभागांतील पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पात्र व अनुभवी उमेदवारांकडून ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.
कारखान्याच्या प्रशासन विभागात कामगार कल्याण अधिकारी, डेटा एन्ट्री क्लार्क आणि सेफ्टी ऑफिसर, तर अभियांत्रिकी विभागात इलेक्ट्रिकल इंजिनिअर, टर्बाइन अटेंडंट आणि बॉयलर अटेंडंट ही पदे भरली जाणार आहेत.
प्रोसेस विभागासाठी लॅब शिफ्ट केमिस्ट आणि गोडाऊन क्लार्क, तर डिस्टिलरी विभागात इन्स्ट्रुमेंट ऑफिसर पदासाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. प्रत्येक पदासाठी स्वतंत्र शैक्षणिक पात्रता आणि अनुभव निश्चित करण्यात आला आहे.
इच्छुक उमेदवारांनी अर्जामध्ये पूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव, साखर उद्योगातील अनुभव आणि अपेक्षित वेतन यांचा स्पष्ट उल्लेख करावा. आवश्यक कागदपत्रांसह अर्ज निर्धारित मुदतीत कारखान्याच्या कार्यालयात पाठविण्याचे आवाहन व्यवस्थापनाने केले आहे. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
Email- ambedkarssk.Io@gmail.com




