खतांची कमतरता भासू देणार नाही

आवडल्यास ही बातमी शेअर करा


पुणे : राज्यात गेल्या तीन खरीप हंगामात (Kharif Season) झालेल्या खतांच्या (Fertilizer) वापरापेक्षाही जादा खत पुरवठा केंद्राने मंजूर केलेला आहे. दरम्यान, दोन लाख टनांचा संरक्षित खत साठा करण्याची तयारी राज्य शासन करीत असून, खताची (Fertilizer) कमतरता भासणार नाही. त्यामुळे खरिपाबाबत (Kharif) शेतकऱ्यांनी संभ्रमात राहू नये, असा दिलासा कृषी विभागाने (Agriculture Sector) दिला आहे.
राज्यातील शेतकऱ्यांनी २०१९ ते २०२१ या तीन खरीप हंगामात सरासरी ४१.७३ लाख टन खतांचा वापर केला होता. मात्र पुढील खरिपासाठी केंद्राने ४५.२० लाख टन खते पुरवठ्याला (Fertilizer supply) मान्यता दिली आहे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी ५६ लाख टन खते पुरवठ्याची मागणी केली आहे. मात्र इतका वापर होत नसल्याने या मागणीनुसार केंद्राने मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे नियोजनाच्या ८७ टक्के टक्के साठा मंजूर करण्यात आलेला आहे.


बुलडाण्यात खरीप हंगामात ९५० कोटी रुपयांचा फटका
राज्यात येत्या खरिपात खतांची (Kharif Fertilizer) टंचाई होईल तसेच किमतीदेखील वाढतील, अशी सुरू असलेली चर्चा अद्यापही थांबलेली नाही. मात्र, ‘‘जागतिक स्तरावर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी पिकास आवश्यकतेनुसार योग्य प्रमाणात खत वापर करावा. त्यामुळे खताची कमतरता उद्‍भवणार नाही. शेतकऱ्यांनी खत कमतरतेचा संभ्रम बाळगू नये,’’ असे संयुक्त आवाहन कृषिमंत्री दादा भुसे, (DaDa Bhuse) प्रधान सचिव एकनाथ डवले व कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी केले आहे.
कृषी विभागाच्या (Agriculture Sector) म्हणण्यानुसार, खरिपासाठी शेतकऱ्यांकडून खताची मागणी व वापर जून, जुलै व ऑगस्टमध्ये होत असतो. या कालावधीमध्ये विविध कारणांमुळे खताच्या पुरवठ्यावर प्रतिकूल परिणाम होतो. कमी आवंटन, पाऊस (Rain) किंवा अतिवृष्टीमुळे रेल्वे वाहतुकीमध्ये अडथळा, रेल्वे रेकची अनुपलब्धता, कारखान्यांमध्ये खत Fertilizer Factory) निर्मिती न होणे, ही कारणे खतांच्या पुरवठ्यात अडथळा आणतात.


‘‘मजुरांच्या उपलब्धतेअभावी खताचा पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. खरिपात युरिया व डीएपीच्या मागणीत वाढतो. त्यामुळे या खतांचा संरक्षित साठा केला जाणार आहे. ऑगस्टअखेर एक लाख टन युरियाचा व ५० हजार टन डीएपीचा साठा केला जाईल. तसेच रब्बीसाठी डिसेंबरअखेर ५० हजार टन युरियाचा साठा केला जाणार आहे. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, विदर्भ सहकारी विपणन संघ तसेच महाराष्ट्र सहकारी विपणन संघाकडून हा साठा होईल,’’ असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

गत तीन हंगामांसह यंदाचा मंजूर खतपुरवठा

खताचा प्रकार. . खरीप २०१९. .खरीप २०२०. .खरीप २०२१. खरीप २०२२ साठी मंजुरी
युरिया १२.७४ १५.३१ १४.०९. १५.५०
डीएपी ३.३८ ५.५५ ३.४ ५.७०
एमओपी १.७८ २.४८ २.२९ ३.००
संयुक्त खते ११.६२ १७.१२ १६.५९ १४.००
एसएसपी ५.३९ ६.४९ ६.९७ ७.००
एकूण ३४.९१ ४६.९५ ४३.३४ ४५.२०

(सर्व आकडे लाख टनांत)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »