*रियल ॲचिव्हर्स ऑफ द महाराष्ट्र* पुरस्काराने बाजीराव गुंडा सुतार यांचा गौरव

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे – येथील ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशनतर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या “रियल ॲचिव्हर्स ऑफ द महाराष्ट्र” या प्रतिष्ठित पुरस्काराने बाजीराव गुंडा सुतार (Bajirao Gunda Sutar) यांना नुकतेच पुणे येथे सन्मानित करण्यात आले.


श्री सुतार हे यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना लिमिटेड रेठरेबुद्रुक तालुका कराड जिल्हा सातारा येथे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कार्यरत असून, सहकारी साखर कारखानदारी क्षेत्रातील त्यांचा सलग 39 वर्षांचा प्रदीर्घ व समृद्ध अनुभव आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी साखर कारखान्यांचे संपूर्ण प्रशासकीय कामकाज अत्यंत प्रामाणिकपणे, पारदर्शकपणे व कार्यक्षमतेने हाताळले आहे.


कारखान्याच्या डिस्टिलरी, को-जनरेशन, इथेनॉल, सीबीजी, acetic acid, acetic anhydride, ethyl acetate, liquor products, बायो-कंपोस्ट, सेंद्रिय खते, जिवाणू खते आदी उपप्रकल्पांच्या उभारणी व प्रभावी व्यवस्थापनामध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. तसेच सर्व विभागांमध्ये संगणकीकरण व ERP सिस्टीमची प्रभावी अंमलबजावणी करून संस्थेच्या प्रगतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर केला आहे.


शासकीय व निमशासकीय अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी, सभासद आणि हितचिंतक यांच्याशी त्यांनी नेहमीच सौहार्दपूर्ण संबंध जपले आहेत. सध्या ते DSTA Pune येथे कौन्सिल मेंबर म्हणूनही कार्यरत आहेत.


त्यांच्या कारकिर्दीत संबंधित साखर कारखान्यांना अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यापूर्वी त्यांना 2013 साली गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री नामदार दिगंबरजी कामतसाहेब यांच्या हस्ते “सहकार भूषण” पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. तसेच 2025 मध्ये “Excellence in Management from Co-operative Sugar Factories in India” हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार आणि डीएसटीएचा “जीवन गौरव पुरस्कार” 2025 देखील प्राप्त झाला आहे.


त्यांच्या नेतृत्वाखाली वारणा 14 लाख 47 हजारMT, इंदापूर 10 लाख 42 हजार, व संजीवनी 9.47 लाख MT साखर कारखान्यांमध्ये विक्रमी गाळप झाले होते. सध्या या हंगामात कृष्णा कारखान्याच्या इतिहासातील सर्वोच्च 14 लाख 19 हजार मेट्रिक टन ऊस गाळप पूर्ण झाले असून, सरासरी साखर उतारा 12.59 टक्के राहिला आहे. यामधून तब्बल 16 लाख 95 हजार साखर पोत्यांचे उत्पादन करण्यात आले आहे.


गतिमान प्रशासकीय कामकाज, पारदर्शक कारभार, कायदेशीर बाबींचा सखोल अभ्यास, गुणवत्तापूर्ण धोरण, खर्चामधील काटकसर, निपक्षपाती भूमिका, धाडसी निर्णयक्षमता आणि वेळेत कामकाजाची अंमलबजावणी यासाठी श्री बाजीराव सुतार हे संपूर्ण महाराष्ट्रातील सहकारी साखर क्षेत्रात सुपरिचित आहेत. सभासद, कर्मचारी व इतर संबंधित घटकांच्या अडीअडचणी शांतपणे समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी ते सातत्याने कार्यरत असतात.


या सर्व कार्याचा गौरव म्हणून ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशनतर्फे त्यांना “रियल अचीवर्स ऑफ द महाराष्ट्र” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वीकारताना श्री सुतार यांनी, “आजवर ज्यांनी सहकार्य केले त्या सर्व मान्यवर व्यक्तींना व स्वर्गीय सहकार महर्षी जयवंतरावजी भोसले साहेब उर्फ आप्पासाहेब यांना हा सन्मान समर्पित करीत आहे,” अशी कृतज्ञ भावना व्यक्त केली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »