‘शोले स्टाईल’ आंदोलनानंतर प्रशासनाचे पाऊल पुढे

आवडल्यास ही बातमी शेअर करा

प्रशासनाने दिलासा देत रक्कम जमा करण्याचे आदेश

पैठण : श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याकडील थकीत उसाच्या बिलांच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (ता. १७) तहसील कार्यालय परिसरातील पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कारखान्याकडे उस उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात बिल थकीत असून त्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. शेतीसाठी आवश्यक खर्च भागवणे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. त्यामुळे थकीत रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी, अशी मागणी संघटनेने केली.

आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने तत्काळ हालचाल करत संबंधित साखर कारखान्यास थकीत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले. या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन स्थगित केले.

तहसीलदार राहुल बनसोडे यांनी सांगितले की, प्रशासन शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत गंभीर असून योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »