उस तोडणी यंत्र भाड्याने देण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

लातूर : तालुक्यातील मळवटी येथील ट्वेंटीवन शुगर्स या कारखान्याने गाळप हंगाम २०२६-२७ साठी उस तोडणी यंत्र (हार्वेस्टर) भाड्याने चालविण्यास देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन कारखान्याकडून करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे स्थानिक उस उत्पादक शेतकरी तसेच उस तोडणीचा अनुभव असलेल्या कंत्राटदारांना रोजगार व व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. कारखान्याकडील आधुनिक हार्वेस्टर यंत्र इच्छुकांना भाड्याने दिले जाणार असून, उस तोडणी प्रक्रियेत यांत्रिकीकरणाला चालना मिळणार आहे.
सध्या उस तोडणी मजुरांची कमतरता भासत असल्याने या योजनेमुळे तोडणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी कमी होण्यास मदत होईल. हार्वेस्टरच्या वापरामुळे जलद व कार्यक्षम तोडणी शक्य होणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकरी व अनुभवी कंत्राटदारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुकांनी निर्धारित नमुन्यात अर्ज करून तो कारखान्याच्या कार्यालयात २० जुलै २०२६ पूर्वी सादर करणे आवश्यक आहे.अधिक माहितीसाठी कारखान्याशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.






