अमित देशमुख, आमदार – माजी मंत्री

विलास सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक आणि राज्याचे माजी मंत्री, लातूरचे विद्यमान आमदार अमित विलासराव देशमुख ऊर्फ अमितभैया यांचा २१ मार्च रोजी वाढदिवस. त्यांना शुगरटुडे मॅगेझीनच्या वतीने खूप खूप शुभेच्छा.
लातूरजवळ मांजरा सहकारी साखर कारखाना उभारला तेव्हा, त्याला त्यावेळी स्व. विलासराव देशमुख यांचे मार्गदर्शन मिळाले होते. त्यांच्याच पुढाकाराने मांजरा उभा राहिला आणि त्याने अनेक विक्रम प्रस्थापित केले. अमित देशमुख यांनी मांजरा कारखान्यात लक्ष घालण्याऐवजी, स्वत:च्या पायावर निवळी येथे विकास शेतकरी सहकारी साखर कारखाना उभा केला. त्यावेळी अमितभैया यांचे वय अवघे २५ वर्षे होते.
विलासराव देशमुख यांच्या दु:खद निधनानंतर याच कारखान्याचे नाव त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विलास सहकारी साखर कारखाना असे ठेवण्यात आले. सध्या या कारखान्याच्या अध्यक्षा वैशाली विलासराव देशमुख आहेत.
राजकीय क्षेत्रात अमित देशमुख यांनी प्रदीर्घ कारकीर्द निर्माण केली आहे. आधी राज्यमंत्री आणि २०१९ मध्ये उच्च शिक्षण मंत्री अशी पदे त्यांनी भूषवली. याखेरीज इतर खात्यांचाही कार्यभार त्यांनी यशस्वीपणे सांभाळला आहे.
लातूर शहरातून ते सलग तीन वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. काँग्रेस संघटनेतही त्यांनी विविध पदे भूषवली आहेत. युवक काँग्रेसचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. सध्या ते राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसचे सचिव आहेत. त्यांना पुन:श्च शुभेच्छा!