बाबा आमटे

सुप्रभात
आज गुरुवार, फेब्रुवारी ९, २०२३
रोजीचे पंचांग आणि दिनविशेष
युगाब्द : ५१२४
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक आज सौर माघ २०, शके १९४४
सूर्योदय : ०७:१० सूर्यास्त : १८:३६
चंद्रोदय : २१:३७ चंद्रास्त : ०९:२४
शक सम्वत : १९४४
संवत्सर : शुभकृत्
उत्तरायण
ऋतू : शिशिर
चंद्र माह : माघ
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : चतुर्थी – पूर्ण रात्रि पर्यंत
नक्षत्र : उत्तराफाल्गुनी – २२:२७ पर्यंत
योग : सुकर्मा – १६:४६ पर्यंत
करण : बव – १९:१३ पर्यंत
द्वितीय करण : बालव – पूर्ण रात्रि पर्यंत
सूर्य राशि : मकर
चंद्र राशि : कन्या
राहुकाल : १४:१८ ते १५:४४
गुलिक काल : १०:०१ ते ११:२७
यमगण्ड : ०७:१० ते ०८:३६
अभिजित मुहूर्त : १२:३० ते १३:१६
दुर्मुहूर्त : १०:५९ ते ११:४४
दुर्मुहूर्त : १५:३३ ते १६:१८
अमृत काल : १४:३५ ते १६:२०
।। ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि। तन्नो दन्ती प्रचोदयात् ।।
आज संकष्टी चतुर्थी आहे
श्री बाबा आमटे – त्यांच्या वडीलांचे नाव देविदास आमटे व आईचे नाव लक्ष्मीबाई . त्यांचे वडील मोठे सावकार होते घरी संपत्तीचा अंबार होता, बालपणीच मुरलीधर यांचे टोपण नाव बाबा ठेवले गेले होते. बालपणापासुन बाबा फार दयाळु होते.
त्याकाळात कुष्ठरोग समाजात फार तेजीने पसरत चालला होता. अनेक लोक या रोगामुळे बाधीत झाले होते यामुळे ते सामान्य जीवनापासुनच नाही तर त्याचे कुटूंबही कुष्ठ रोग्यांना त्याग करून घराबाहेर काढू लागले होते. कुष्ठरोग पापी माणसाची निशाणी बनली होती, समाजात त्यांना फारच हिन भावनेचा सामना करावा लागत होता.
बाबांनी अशाच निराधार लोकांची सेवा करायचे ठरविले लोकांना ते या आजाराबद्दल जागरूक करून याची लक्षणे व प्रतिबंध कसा करायचा याचीही माहिती देत. कुष्ठरोग्यांना योग्य सामाजिक स्थान मिळविण्यासाठी त्यांनी आपली कंबर कसली. त्यांनी १५ ऑगस्ट १९४९ रोजी महाराष्ट्रात तीन आश्रमांची स्थापना केली, त्यांना त्यांनी नंदनवन हे नाव दिले येथे कुष्ठरोग्यांना राहण्या व उपचाराची सोय उपलब्ध होती त्यासोबत त्यांना रोजगाराची सोयही उपलब्ध करून दिली.
१९७३ साली गडचिरोली जिल्हयातील मदिया गोंड जमातीच्या आदिवासी समुदायांना संघटीत करून त्यांनी लोक बिरादरी प्रकल्प स्थापन केला. बाबा आमटे हे आपल्या जीवना अखेरपर्यंत सामाजिक कार्यात मग्न होते. सामाजिक एकता व समभाव निर्माण होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. जंगली जनावरांच्या कत्तली व तस्करी करण्यापासुन रोखण्यास लोकांना प्रेरीत केले.
महाराष्ट्रातील आनंदवन सामाजिक विकास प्रकल्प आज जगात जाणल्या व प्रशंसेचे पात्र ठरले आहे. आनंदवनात बाबांनी कुष्ठरोगींच्या उपचारासाठी सोमनाथ व अशोकवन आश्रम स्थापन केले होते. भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार (सन् १९७१) व पद्म विभूषण (१९८६) देऊन सन्मानित केले. तसेच डी.लिट – टाटा इंस्टीटयुट आॅफ सोशल सायन्स मुंबई , भारत १९९९, डी.लिट – १९८० नागपुर युनिव्हर्सिटी नागपुर , डी लिट – १९८५ – ८६ पुणे युनिव्हर्सिटी महाराष्ट्र, देसिकोत्तमा १९८८ – सन्माननीय डाॅक्टरेट, विश्वभारती युनिव्हर्सिटी, शांतीनिकेतन पश्चिम बंगाल, पुरस्कार देऊन विविध संस्थांनी त्यांचा गौरव केला आहे. बाबांनी सुरु केलेल्या कार्याचा वसा घेऊन त्यांच्या पुढील पिढ्या कार्यरत आहे.
• २००८: कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे यांचे निधन. (जन्म: २६ डिसेंबर १९१४)
घटना :
१९००: लॉन टेनिस या खेळातील डेव्हिस कप या करंडकाची सुरूवात झाली.
१९३३: साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना श्यामची आई या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली.
१९५१: स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सुरू.
१९६९: बोइंग-७४७ विमानाचे पहिले चाचणी उड्डाण झाले.
• मृत्यू :
• १८९७ : भारतीय कामगार पुढारी रावबहाद्दुर नारायण मेघाजी लोखंडे त्यांचे निधन ( जन्म : १३ ऑगस्ट, १८४८ )
• १९६६: बालमोहन नाटक मंडळीचे संस्थापक दामूअण्णा जोशी यांचे निधन.
• १९७९: चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते राजा परांजपे यांचे निधन. (जन्म: २४ एप्रिल १९१०)
• १९८१: न्यायाधीश, मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री एम. सी. छागला यांचे निधन. (जन्म: ३० सप्टेंबर १९००)
• १९८४: भरतनाट्यम नर्तिका तंजोर बालसरस्वती यांचे निधन. (जन्म: १३ मे १९१८)
• २०००: चित्रपट अभिनेत्री व निर्माती शोभना समर्थ यांचे निधन. (जन्म: १७ नोव्हेंबर, १९१६ )
• २००१: माजी हवाई दल प्रमुख, एर चीफ मार्शल दिलबागसिंग यांचे निधन.
जन्म:
१८७४: स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९२६ – नाशिक)
१९१७: गांधीवादी नेते, सिक्कीमचे पहिले राज्यपाल, मंत्री व आमदार होमी जे. एच. तल्यारखान यांचा जन्म. (मृत्यू: २७ जून १९९८)
१९२२: भारतीय उद्योगपती लीला पॅलेस हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स चे संस्थापक सी. पी. कृष्णन नायर यांचा जन्म. (मृत्यू: १७ मे २०१४)
१९२९: महाराष्ट्रचे ८वे मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचा जन्म. (मृत्यू: २ डिसेंबर २०१४)
१९४८ : सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार, वाचकप्रिय ब्लॉगर व लेखक गणेश वसंत तोरसेकर तथा भाऊ तोरसेकर यांचा जन्म
गोविंद त्र्यंबक दरेकर तथा कवी गोविंद
(जन्म : ९ फेब्रुवारी १८७४ निधन : २८ फेब्रुवारी १९२६) यांचा जन्म नासिकचा. लहानपणीच तापामुळे कमरेखालील सर्व अंग लुळे पडून त्यांना कायमचे अपंगत्व आले त्यामुळे त्यांचे शिक्षणही होऊ शकले नाही. कविता मात्र बालपणापासून करीत होते.
आरंभी ते लावण्या लिहीत. ‘हौशिने करा मसि गेंद गेंद । घडवा हो बाजुबंद ।’ ही लावणी म्हणजे त्यांची पहिली उपलब्ध कविता. तथापि १९०० मध्ये नासिकमधील ‘मित्रमेळा’ ह्या तरुण क्रांतिकारकांच्या संघटनेशी आणि विशेषतः स्वातंत्रवीर सावरकरांशी निकटचे संबंध आल्यानंतर त्यांच्या कवितेला उत्कट राष्ट्रभक्तीची आणि तीव्र स्वातंत्र्याकांक्षेची दिशा गवसली.
शिवाजी महाराज , तानाजी, रामदास ह्यासारख्या ऐतिहासिक पराक्रमी पुरुषांवर आणि संतांवर त्यांनी लिहिलेल्या कविता तसेच ‘स्वातंत्र्याचा पाळणा’, ‘स्वातंत्र्यलक्ष्मीस्तव’, ‘भारतप्रशस्ति’ ह्यांसारख्या कविता ह्याच्या द्योतक आहेत. देशभक्तीने भारलेल्या त्यांच्या अनेक कविता ब्रिटिश सरकारने जप्त केल्या होत्या.
‘स्वातंत्र्यशाहीर’ म्हणून ते महाराष्ट्रात ख्याती पावले. ‘मुरली’ ‘वेदान्ताचा पराक्रम’, ‘गोविंदाचे करुणगान’ ह्यांसारख्या कवितांतून त्यांची अध्यात्मपरता प्रत्ययास येते. ‘टिळकांची भूपाळी’ आणि ‘सुंदर मी होणार’ ह्या त्यांच्या कविता विशेष ख्याती पावल्या. मृत्यूच्या थोडे दिवस आधी लिहिलेल्या ‘सुंदर मी होणार’ ह्या त्यांच्या सर्वोत्कृष्ट कवितेत ‘नव्या तनूचे आणि नव्या शक्तीचे’ पंख देणाऱ्या मृत्यूचे स्वागत केलेले आहे.
अपंगत्वामुळे आलेल्या न्यूनत्वासाठीच नव्हे, तर ह्या जन्मातील कोणत्याच ‘जीर्णजुन्यास्तव’ न झुरता ‘नव्या अवतारासाठी’ मृत्यूकडे जाणाऱ्या एका मनाचा उदात्त व आत्मपर आविष्कार तीत आढळतो. कवि गोविंद यांची कविता (एकूण ५२ कविता) ह्या नावाने त्यांच्या कविता संगृहीत झालेल्या आहेत (१९३०). नासिक येथेच ते निधन पावले.
अ. र. कुलकर्णी. (मराठी विश्वकोश)
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .
गणेश वसंत तोरसेकर तथा भाऊ तोरसेकर
आज सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार, वाचकप्रिय ब्लॉगर व लेखक भाऊ तोरसेकर यांचा वाढदिवस. (जन्म : ९ फेब्रुवारी १९४८)
भाऊ तोरसेकर हे सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार, वाचकप्रिय ब्लॉगर व लेखक असून स्थानिक राजकारणापासून ते आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सडेतोड भाष्य करण्यात त्यांची हातोटी आहे. भाऊ तोरसेकर यांचे शालेय शिक्षण डी. एस. हायस्कूल, सायन व महाविद्यालयीन शिक्षण डी. जी रुपारेल कॉलेज, माटुंगा येथे झाले.
भाऊ तोरसेकर यांनी खरे आर्किटेक्चरमध्ये पदवी घेतलीय. पण भाऊंच्या पत्रकारितेमागच्या या आर्किटेक्टची गोष्ट लोकांना फारशी माहीत नाही. भाऊ तोरसेकर यांनी १९६९ मध्ये आचार्य अत्रे यांच्या दैनिक मराठा येथून पत्रकारितेच्या कारकीर्दीला सुरुवात केली. भाऊ तोरसेकर यांनी साप्ताहिक भूपुत्र, ब्लिट्झ (मराठी), सकाळ (मुंबई) मधून पत्रकारीता केली.
१९८५ ते १९८९ या काळात शिवसेनेचे मुखपत्र मार्मिक या साप्ताहिकातून कार्यकारी संपादक म्हणून काम पाहिले. त्यानंतर विवेक, चित्रलेखा यांसारख्या सप्ताहिकांमध्ये त्यांनी काम केले. १९९४ ते १९९७ च्या दरम्यान ‘आपला वार्ताहर’चे मुख्य संपादक म्हणून काम पाहिले. भाऊ १९९८पासून स्वतंत्र पत्रकार म्हणून काम करत आहेत.
भाऊ तोरसेकर यांनी २०१० मध्ये ‘पुण्यनगरी’ दैनिकातून उलट तपासणी हे सदर चालवलं. जागता पहारा या नावाचा त्यांचा एक ब्लॉग आहे. तसेच त्यांचं ‘ प्रतिपक्ष ‘ नावाचे यूट्यूब चॅनेल आहे.
(संजीव वेलणकर पुणे. ९४२२३०१७३३)
आपला दिवस मंगलमय जावो
संकलन : डॉ. वासुदेव शंकर डोंगरे, पुणे