महिला दिनी श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्यावर विशेष कार्यक्रम

पाटेठाण: दरवर्षी ८ मार्च हा दिवस जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या कर्तृत्वाचा, त्यांच्या संघर्षाचा आणि समाजातील योगदानाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. त्यास अनुसरून या महिला दिनाच्या निमित्ताने श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना लि.च्या कारखाना साईटवर सायं. ४.०० वाजता महिला दिन उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी कारखाना कर्मचारी वसाहतीमधील तसेच कारखाना परिसरातील महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमामध्ये बोलताना सौ. सुमन…











