Category आणखी महत्त्वाचे

इथेनॉलसाठी शाश्वत धोरण, साखर कारखान्यांना आर्थिक आधार द्या : बिपीन कोल्हे

कोपरगाव : शेतकरी आणि साखर कारखानदारांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीबाबत दीर्घकालीन, शाश्वत धोरण आखावे. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह सहकारी साखर कारखान्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष व साखर उद्योगाचे ज्येष्ठ…

साखर कारखाने सुरू करण्यावरून मतभेद!

ईश्वरपूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वीच कारखाने सुरू करण्याच्या वेळेवरून शेतकरी संघटनांच्या नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन कारखाने लवकर सुरू करावेत, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी केली आहे. दुसरीकडे, उसाची…

ऊस वाहतुकीत सुरक्षिततेकडे दुर्लक्ष!

वसमत परिसरात गाळप हंगामाला सुरुवात; ओव्हरलोड वाहतुकीवर कारवाईची मागणी वसमत : तालुक्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला असून, गूळ व गूळपावडर तयार करणाऱ्या कारखान्यांकडेही ऊस वाहतुकीला वेग आला आहे. मात्र, अनेक ट्रॅक्टर-ट्रॉलींवर रेडियम पट्टे आणि रिफ्लेक्टर नसल्याने रात्रीच्या वेळी…

पंधरा दिवसांत बोलणी करा, अन्यथा कारखान्यांची धुराडी बंद पाडू : सुरेश धस

Suresh Dhas, MLC

वडवणी (जि. बीड) : ऊसतोडणी कामगार, वाहतूकदार आणि मुकादमांच्या मागण्यांबाबत साखर संघाने तातडीने बोलणी करावीत. पंधरा दिवसांत तोडगा न निघाल्यास साखर कारखान्यांवर जाऊन धुराडी बंद पाडू आणि संप पुकारू, असा इशारा आमदार सुरेश धस यांनी दिला. वडवणी येथे गुरुवारी आयोजित…

ऊस गाळप हंगामाला हिरवा कंदील; २१० साखर कारखान्यांना परवानगी

पुणे : राज्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरू करण्यासाठी परवानगी देण्याची प्रक्रिया साखर आयुक्तालयाकडून सुरू करण्यात आली आहे. यंदा गाळप परवान्यासाठी एकूण २१० कारखान्यांनी अर्ज केले आहेत. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन आवश्यक तयारी पूर्ण असलेल्या कारखान्यांना १५ ऑक्टोबरपूर्वीही गाळप…

उसाला प्रतिटन ६,५०० रुपये द्या; अन्यथा कारखाने सुरू होऊ देणार नाही

— किसान सभेचा इशारा कोल्हापूर : स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार ‘सी-२ अधिक ५० टक्के’ या सूत्राच्या आधारे उसाला प्रतिटन ६,५०० रुपये दर जाहीर करावा, अशी मागणी राज्य किसान सभेच्या ऊस उत्पादक शेतकरी मेळाव्यात करण्यात आली. शेतकऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय दर निश्चित करू…

आगीचा कहर; दहा एकर ऊस जळून खाक

बाभळेश्वर, ता. श्रीरामपूर : महावितरणच्या तांबेवाडी विद्युत वाहिनीवरील कट पॉइंटवर शॉर्टसर्किट झाल्याने बाभळेश्वर बुद्रुक परिसरातील सुमारे दहा एकर ऊस आगीत जळाल्याची घटना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. आग लागल्याचे समजताच परिसरातील शेतकऱ्यांनी आग…

जागतिक साखर फ्युचर्स बाजार

– १ ऑक्टोबर २०२६ अपडेट ३० सप्टेंबरच्या सत्रानंतर बाजारात पुन्हा नरमाई आली आहे. प्रत्यक्ष बाजारातील कमजोर मागणी आणि वाढीव पुरवठ्यामुळे किमती घसरल्या आहेत. न्यूयॉर्कमध्ये US रॉ शुगर #11 फ्युचर्स १.१७% घसरून १८.६२ सेंट्स/पाउंड वर, तर लंडनमध्ये डिसेंबर व्हाईट शुगर #5…

‘कुंभी-कासारीच्या ऊसपुरवठादार सभासदांना दहा रुपयांत साखर’

KUMBHI KASARI SSK

कसबा ठाणे : कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याला ऊसपुरवठा करणाऱ्या सभासदांना सवलतीची साखर दहा रुपये दराने देण्यात येईल, अशी घोषणा कारखान्याचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांनी केली. ऊसपुरवठा न करणाऱ्या सभासदांसाठी साखरेचा दर २५ रुपये निश्चित करण्यात आला आहे. कारखान्याच्या कार्यस्थळावर…

ऊसदर ठरवा, त्यानंतरच गाळप सुरू करा; ‘स्वाभिमानी’चा इशारा

सांगली : उसाचा दर निश्चित झाल्याशिवाय सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू करू नये. १० ऑक्टोबरपूर्वी गाळप सुरू करण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधित कारखान्यांचे वजनकाटे बंद पाडून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा यांनी दिला.…

Select Language »