केंद्राकडून जूनचा साखर विक्रीचा कोटा जाहीर

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे :  बाजारात साखरेला मागणी नसल्याने मे महिन्याच्या कोट्यातील सुमारे ५० हजार टन साखर अद्याप कारखान्यांकडे शिल्लक आहे. बाजारातील साखरेचे दर नियंत्रित राहावे, यासाठी साखर कारखान्यांना साखर विक्रीसाठी केंद्र सरकार महिन्याला कोटा देत असते. केंद्र सरकारने जून महिन्यातील साखर विक्रीचा कोटा नुकताच जाहीर केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दोन लाख टन कमी आहे. साखर कारखान्यांसाठी २३.५० लाख टन साखर विक्री करता येणार आहे.

दरम्यान, केंद्राने जून महिन्याचा कोटा दिला असला तरी बाजारात साखरेची मागणी अपेक्षित नाही, त्यामुळे ही ५० हजार टन साखर कारखान्यांकडे पडून आहे. साखरेचे भाव वाढण्याची शक्यता कमी असून, सध्या या प्रति क्विंटल ३७५० दर राहू शकतो, असे भाकित साखर उद्योगक्षेत्रातील काही जाणकारांनी वर्तविले आहे.

गेल्या वर्षी जूनमध्ये २५.५० लाख टन विक्रीचा’ कोटा दिला होता. मात्र, यंदा दोन लाख टनाने कमी दिला आहे. आगामी ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होणाऱ्या गळीत हंगामात उसाचे बंपर पीक येण्याची शक्यता असल्याने साखरेचे उत्पादनही वाढणार आहे. देशभरातील साखर कारखान्यांकडे सध्या १३० लाख टन साखर शिल्लक आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »