महाराणी अहिल्याबाई होळकर

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज शनिवार, मे ३१, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर ज्येष्ठ १०, शके १९४७
सूर्योदय : ०६:०० सूर्यास्त : १९:१२
चंद्रोदय : १०:०१ चंद्रास्त : २३:३३
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
उत्तरायण
ऋतु : ग्रीष्म
चंद्र माह : ज्येष्ठ
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : पञ्चमी – २०:१५ पर्यंत
नक्षत्र : पुष्य – २१:०७ पर्यंत
योग : वृद्धि – १०:४४ पर्यंत
करण : बव – ०८:४२ पर्यंत
द्वितीय करण : बालव – २०:१५ पर्यंत
सूर्य राशि : वृषभ
चंद्र राशि : कर्क
राहुकाल : ०९:१८ ते १०:५७
गुलिक काल : ०६:०० ते ०७:३९
यमगण्ड : १४:१५ ते १५:५४
अभिजितमुहूर्त : १२:१० ते १३:०३
दुर्मुहूर्त : ०६:०० ते ०६:५३
दुर्मुहूर्त : ०६:५३ ते ०७:४६
अमृत काल : १४:४९ ते १६:२३

तंबाखू सेवन ही शालेय मुलांमध्ये आज सर्वांत मोठी चिंतेची बाब असून लहान मुलांमधील व्यसनाचे प्रमाण कमी करण्यासाठी पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. पालकांनी मुलांसमोर स्वत: व्यसन न करता व्यसनापासून परावृत्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण ज्येष्ठांचेच अनुकरण लहान मुले करतात व परिणामी वाढत्या वयात मुले व्यसनाधीन होतात. त्यामुळे व्यसनापासून मुक्तता ही योग्य वयातच झाली पाहिजे. व्यसनापासून परावृत्त होण्यासाठी व्यायाम, प्राणायाम, योगासने, आवडीचा छंद जोपासून त्यात रममाण होणे, व्यसनी संगतीपासून लांब राहणे, वैद्यकीय मदत घेणे यासारखे उपाय करता येतील. व्यसनमुक्तीकडे सुरु असलेल्या प्रक्रियेमध्ये समाजातील सर्व स्तरावरील घटकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे.

( एक विरोध भास – तंबाखू जन्य पदार्थांमुळे कर्करोग होतो सरकार त्यासाठी जागरुकतेसाठी खर्च करते , रुग्णांना कमी खर्चात औषधे पुरवते इ. पण महसूल मिळावा म्हणून तंबाखू जन्य पदार्थ निर्मिती साठी खुले परवाने देते. )

आज जागतिक तंबाखू विरोधी दिन आहे.

  • महाराणी अहिल्याबाई होळकर – अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर यांचे इ.स. १७५४ मध्ये, कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यांच्या मृत्यूनंतर सासरे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही. १२ वर्षांनंतर, मल्हारराव होळकर हेही मृत्यू पावले. त्यानंतर अहिल्याबाई मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या. अहिल्याबाईंनी आपल्या राज्याला तुंगांपासून वाचवले. त्या लढाईत अहिल्यादेवी स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या. पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली.

उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध असलेल्या राणी अहिल्यादेवी यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, किंवा त्यांचा जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ येथील सोमनाथचे गझनीच्या महंमदाने उध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक शंकराचे एक देऊळ बांधले.

एका इंग्रजी लेखकाने अहिल्यादेवी होळकर, यांना भारताच्या “कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ, मार्गारेट” म्हटले आहे. तर एक इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्याबाई यांची तुलना रशियाची राणी कथेरीन , इंग्लंडची राणी एलिझाबेथ तसेच डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी केली आहे.

१७२५: महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १७९५)

नामवंत तबलावादक पंडित सामताप्रसाद – सामताप्रसाद यांना बालवयापासूनच तबलावादनात स्वारस्य निर्माण झाले होते. तबलावादनाचे प्राथमिक शिक्षण त्यांना वडिलांकडून मिळाले. मात्र सामताप्रसाद सात वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे पं. विक्रमादित्य मिश्र उर्फ बिक्कू (बिक्कूनी) महाराज यांच्याकडून त्यांनी त्यानंतरचे उच्च शिक्षण प्राप्त केले.

बनारस घराण्याच्या परंपरेनुसार त्यांनी तबलावादनाचा कठोर रियाझ केला व सर्व महत्त्वपूर्ण बोलसमूहांवर प्रभुत्व मिळविले. तीन ताल, रूपक, धमार आणि सवारी हे त्यांचे आवडते ताल होते.

स्वतंत्र तबलावादनाप्रमाणेच नृत्य व तंतुवाद्याच्या स्पर्धांमध्येही त्यांनी आपले स्वतंत्र महत्त्वपूर्ण स्थान प्रस्थापित केले होते. खूप वरच्या लयीत सुद्धा सुस्पष्ट निकास, तबला वादनाची आकर्षक मांडणी व त्यातील विलक्षण गोडवा ही त्यांची महत्त्वाची वैशिष्ट्ये. त्यांचा बायाँ (डाव्या हाताने वाजवितात तो डग्गा अथवा बायाँ) खूप तयारीत वाजत असे. काही विद्वानांच्या मते बनारस घराण्यात बायाँचे मैदान प्रेक्षकांकडे वळवून ठेवण्याची पद्धत सामताप्रसाद यांनीच सुरू केली. एच्. एम्. व्ही. ने त्यांची एक ‘लाँग प्लेइंग ध्वनिमुद्रिका’ प्रसिद्ध केली आहे.
सामताप्रसाद यांनी आपल्या विशिष्ट शैलीतील उत्कृष्ट तबलावादनाने देशविदेशांतील असंख्य रसिकांना मंत्रमुग्ध केले. १९४२ मध्ये अलाहाबाद येथील संगीत संमेलनात त्यांचा पहिला कार्यक्रमात झाला. त्यांच्या उत्कृष्ट तबलावादनाने इतर संगीतकारही खूप प्रभावित झाले होते. भारतामध्ये कोलकाता, चेन्नई, मुंबई, लखनौ तसेच विदेशात फ्रान्स, एडिनबर्ग, रशिया इत्यादी ठिकाणी शास्त्रीय संगीत सादर करण्याची त्यांना संधी मिळाली.

विशेष म्हणजे एडिनबर्ग येथे भारतीय सांस्कृतिक संघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले. मेरी सुरत तेरी आँखे, शोले, झनक झनक पायल बाजे, बसंत बहार या चित्रपटांसाठी त्यांनी केलेले तबलावादन गाजले. प्रसिद्ध संगीतकार आर्. डी. बर्मन (राहुल देव बर्मन ) हे त्यांच्या उत्तम शिष्यांपैकी एक होत.
सामताप्रसाद यांना त्यांच्या तबलावादनातील विलक्षण कौशल्य व या क्षेत्रातील असाधारण योगदानाबद्दल विविध मानसन्मान व पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले. त्यांपैकी काही महत्त्वाचे पुरस्कार पुढीलप्रमाणे : हरिदास संगीत संमेलन, मुंबई (१९५२); ललित कला अकादमी, कानपूर (१९६६); सूरदास संगीत संमेलन सन्मान, कोलकाता (१९७०); संगीत नाटक अकादमी पुरस्कार, उत्तर प्रदेश (१९७२); भारत सरकारतर्फे पद्मश्री (१९७२); संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९७९); अध्यक्ष अधिछात्रवृत्ती (१९८७); पद्मभूषण (१९९१) इत्यादी. यांशिवाय ‘ताल-शिरोमणी’, ‘तार्ल-मार्तंड’ म्हणूनही त्यांना गौरविण्यात आले.

१९९४: पद्म भूषण पुरस्कार सन्मानित बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक पंडित सामताप्रसाद यांचे निधन. (जन्म: २० जुलै १९२१ – वाराणसी)

  • घटना :

१९१०: दक्षिण अफ्रिकेला स्वातंत्र्य मिळाले.
१९१६ : स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळविणारच !”……
ब्रिटीश सरकारला धडकी भरविणारी ही ‘सिंहगर्जना’ लोकमान्य टिळकांनी १०५ वर्षांपूर्वी केली होती.

१९३५: पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील क्वेट्टा येथे झालेल्या ७.७ रिच्टर तीव्रतेच्या भूकंपात ५६,००० लोक ठार झाले.
१९४२: दुसरे महायुद्ध – जपानी पाणबुड्यांनी सिडनी शहरावर हल्ल्यांचे सत्र सुरू केले.
१९५२: संगीत नाटक अकादमी ची स्थापना.
१९६१: दक्षिण अफ्रिका प्रजासत्ताक बनले.
१९७०: पेरू देशातील ७.९ तीव्रतेच्या भूकंपामुळे ७०,००० च्या दरम्यान मृत्युमुखी पडले आणि ५०,००० जण जखमी झाले.
१९९०: नेल्सन मंडेला यांना लेनिन आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार जाहीर.

• मृत्यू :

• १८७४: प्राच्यविद्या पंडित, पुरातत्त्वज्ञ रामकृष्ण विठ्ठल तथा भाऊ दाजी लाड यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १८२२ – मांजरे, पेडणे, गोवा)
१९७३: कथालेखक दिवाकर कृष्ण केळकर तथा दिवाकर कृष्ण यांचे निधन. (जन्म: १९ ऑक्टोबर १९०२ – गुंटकल, अनंतपूर, आंध्र प्रदेश)
२००२: लेग स्पिनर सुभाष गुप्ते यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर, १९२९)
२००३: प्रतिभासंपन्न संगीतकार अनिल बिस्वास यांचे निधन. (जन्म: ७ जुलै,१९१४)

  • जन्म :
    १९१०: बालसाहित्यकार, विज्ञानकथाकार भास्कर रामचंद्र तथा भा. रा. भागवत यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर, २००१)
    १९२१: आधुनिक गुजराथीतील प्रसिद्ध कवी सुरेश हरिप्रसाद जोशी यांचा जन्म. (मृत्यू: ६ सप्टेंबर,१९८६ )
    १९२८: क्रिकेटपटू पंकज रॉय यांचा जन्म. (मृत्यू: ४ फेब्रुवारी, २००१)
    १९३८: नाट्यसमीक्षक विश्वनाथ भालचंद्र तथा वि. भा. देशपांडे यांचा जन्म. ( मृत्यू : ९ मार्च, २०१७)
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »