डॉ. यशवंत कुलकर्णी

कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कर्तव्यदक्ष, प्रयोगशील, द्रष्टे कार्यकारी संचालक डॉ. श्री. यशवंत कुलकर्णी यांचा १ जुलै रोजी वाढदिवस. त्यांना ‘शुगरटुडे’ मासिकाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा!
डॉ. यशवंत कुलकर्णी गेल्या तीन दशकांपासून साखर उद्योग क्षेत्रात कार्यरत असून, त्यांचे या क्षेत्रासाठी खूप मोठे योगदान आहे. त्याबद्दल त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. ते विविध संस्था आणि समित्यांवर पदाधिकारी आहेत. महाराष्ट्र राज्य सह. साखर कारखाना एमडी असोसिएशनचे ते उपाध्यक्ष असून, को-जन असोसिएशन ऑफ इंडियाचेही संचालक आहेत.
अलीकडेच त्यांना दी शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशन ऑफ इंडिया (STAI) या नामांकित संस्थेचा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ जाहीर झाला आहे. ते M.com, M.Phil, G.D.C & A अर्हताधारक आहेत, तसेच त्यांनी Ph.D. देखील मिळवली आहे. भारतीय शुगरचा गतवर्षीचा (२०२४) चा सर्वोत्कृष्ट कार्यकारी संचालक पुरस्कार त्यांना मिळाला आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने त्यांना २०२२ साली ‘बेस्ट एमडी’ पुरस्काराने गौरवले आहे.
महाराष्ट्रातील आघाडीच्या, श्रीपूर येथील प्रसिद्ध कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक पदाची धुरा ते गेल्या बारा वर्षांपासून यशस्वीपणे सांभाळत आहेत. त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा!