DSTAI चे 19 जूनला पुण्यात चर्चासत्र

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : “साखर – इथेनॉल गुणवत्ता सुधारण्यासाठी ज्यूस शुद्धीकरण तंत्रज्ञान” या विषयावर डीएसटीएआयच्या (डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टस्‌ असो. ऑफ इंडिया) वतीने संस्थेच्या पुण्यातील सभागृहात येत्या १९ जून रोजी एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

या सेमिनारला उपस्थित राहण्यासाठी ‘डेलिगेशन फी’ आकारली जाणार नाही. नवीन कार्बोनेशन प्रक्रियेबाबत या चर्चासत्रात सविस्तर चर्चा होईल. नामवंत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
या सेमिनारसाठी अधिकाधिक संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन डीएसटीएआयने केले आहे. सहभागाबाबत संस्थेच्या ईमेलवर कळवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

2 Comments

Leave a Reply to Firoj shaikhCancel reply

Select Language »