ईव्ही मर्सिडीज सुमारे दीड कोटीची

पुणे : देशातील सर्वात मोठी लक्झरी ईव्ही (इलेक्ट्रिक वाहन) निर्मात्या मर्सिडीज-बेंझने पुण्याजवळील चाकण प्लांटमध्ये भारतातील पहिली असेंबल केलेली लक्झरी EQS 580 नुकतीच लाँच केली. भारतातील ही ईव्ही मर्सिडीज सुमारे दीड कोटींची आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी आवर्जून उपस्थित होते. देशाने यापुढे इथेनॉल इंधनाच्या आणि इलेक्ट्रिक वाहनांवरवर अधिक भर देण्याचे ठरवले आहे, असे त्यांनी सांगितले.

“आज 35-40 टक्के प्रदूषण हे जीवाश्म इंधनामुळे होते. म्हणूनच आम्ही ऑटोमोबाईल उद्योगाला इलेक्ट्रिक वाहने बनवण्यासाठी प्रोत्साहन देत आहोत,” असे नितीन गडकरी यांनी सांगितले. आज भारतात सुमारे 30 टक्के ऊर्जा सौर आहे. ते ६० टक्क्यांवर नेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असे ते म्हणाले. नवीन मर्सिडीज-बेंझ ईव्ही 1.55 कोटी रुपयांच्या किंमतीत लॉन्च करण्यात आली.
सध्या, भारतीय ऑटोमोबाईल उद्योगाचा आकार 7.8 लाख कोटी आहे, त्यापैकी 3.5 लाख कोटी निर्यात आहे. “माझे स्वप्न हे 15 लाख कोटींचा उद्योग बनवण्याचे आहे. पेट्रोलच्या जागी ते 100 टक्के इथेनॉलवर वळवण्याचे माझे स्वप्न आहे. आम्हाला बायो इथेनॉल आणि फ्लेक्स इंधन यांसारख्या इंधनांसह कृषी क्षेत्रात ऊर्जा आणि ऊर्जा क्षेत्रात विविधता आणायची आहे. आमचे सरकार पेट्रोल आणि डिझेल वाहनांना प्रोत्साहन देणार नाही. इलेक्ट्रिक, ग्रीन हायड्रोजन आणि फ्लेक्स इंधनांवर चालणाऱ्या वाहनांना भारतात मोठी बाजारपेठ मिळेल याची मला खात्री आहे, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.