कोल्हापुरी गुळ बंद होण्याच्या मार्गावर

आवडल्यास ही बातमी शेअर करा

गुऱ्हाळघरांना घरघर; जिल्ह्यात केवळ ९० गुऱ्हाळघरे शिल्लक आहेत

कोल्हापूर  : गुन्हाळघरांचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापूरच्या गुळाची जगात ख्याती आहे. मात्र, गुळाच्या दरातील चढ-उतार, मजूर टंचाई व व्यापाऱ्यांच्या मनमानीला शेतकरी कंटाळला आहे. साखर कारखाने हमी भाव देत असल्याने जिल्ह्यातील शेतकरी गुऱ्हाळघराकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील गूळ उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात बोटावर मोजण्या इतकेच गुऱ्हाळघरे शिल्लक राहिले आहेत.

गुळाचा दर व प्रत यावर दर ठरत असतो, पण ती व्यवस्था व्यापाऱ्यांनी हायजॅक केली असल्याने उत्पादन खर्च व गुळाला मिळणारा दर यात तफावत निर्माण झाली असल्याने वारंवार हा व्यवसाय तोट्यात निघाला आहे. जीआय टिकवण्याचे आव्हान शुद्ध उसाच्या रसापासून नैसर्गिक गूळ निर्माण करण्याची प्रथा आहे. २००५ पूर्वीचा विचार केला तर त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यात १२०० गुन्हाळघरे होती. सध्या केवळ ९० गुन्हाळघरे शिल्लक राहिली आहेत. करवीर तालुक्यात यातील ७०० गुन्हाळघरांची संख्या होती. पण, मजुरांची संख्या दिवसेंदिवस घटल्याने या उद्योगावर परिणाम झाल्याचे दिसून येते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »