जागतिक कावीळ दिवस

आज सोमवार, मे १९, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर वैशाख दिनांक २९, शके १९४७
सूर्योदय: ०६:०३ सूर्यास्त : १९:०८
चंद्रोदय : ००:४८, मे २० चंद्रास्त : ११:२७
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
उत्तरायण
ऋतु : वसंत
चंद्र माह : वैशाख
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : षष्ठी – ०६:११ पर्यंत
क्षय तिथि : सप्तमी – ०५:५१, मे २० पर्यंत
नक्षत्र : श्रवण – १९:२९ पर्यंत
योग : ब्रह्म – ०४:३६, मे २० पर्यंत
करण : वणिज – ०६:११ पर्यंत
द्वितीय करण :विष्टि – १८:०५ पर्यंत
क्षय करण :बव – ०५:५१, मे २० पर्यंत
सूर्य राशि : वृषभ
चंद्र राशि : मकर
राहुकाल : ०७:४१ ते ०९:१९
गुलिक काल : १४:१३ ते १५:५१
यमगण्ड : १०:५७ ते १२:३५
अभिजित मुहूर्त : १२:०९ ते १३:०१
दुर्मुहूर्त : १३:०१ ते १३:५४
दुर्मुहूर्त : १५:३८ ते १६:३१
अमृत काल : ०८:४९ ते १०:२८
वर्ज्य : २३:३० ते ०१:०६, मे २०
काविळचे प्रकार आणि लक्षणे –
हेपटायटीस ए, हेपटायटीस बी, हेपटायटीस सी, हेपटायटीस ई हे त्याचे सर्वसाधारण प्रकार आहेत. हिपेटायटिस ए आणि हिपेटायटिस ई व्हायरस – हे व्हायरस दूषित पाणी किंवा दूषित अन्नातून आपल्या पोटात जातात. ते यकृतावर हल्ला करतात आणि आपण जी कावीळ म्हणतो ती याचमुळे होते. यामध्ये रुग्णाला थकवा आणि ताप येतो. डोळे पिवळे होतात आणि लघवी पिवळसर लाल होते. यकृताला सूज येते. काविळचे निदान लवकरात लवकर होणं आवश्यक असतं.
“आरोग्याची काळजी घ्या “
आज जागतिक कावीळ दिवस आहे.”
१९१३: भारताचे ६ वे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १९९६ – बंगळुरू)
श्री यादवराव कालकर – संघ कार्याशिवाय ज्यांनी स्वतःचे खासगी जीवन काहीच ठेवले नाही. अशा संघ प्रचारकांपैकी एक संघ प्रचारक श्री यादवराव कालकर. संघ कार्याकरिता ज्यांचेकडे जात तेच त्यांचे आप्तेष्ट बनले. त्यांची आत्मीयता जशी घरच्या व्यक्तींबरोबर असते तशीच ती संघ स्वयंसेवकांबरोबर झालेली होती.
यादवरावजींचा जन्म देऊळघाट, बुलढाणा जिल्ह्यात. घरचा शेती . शालेय शिक्षण सुरु असताना संघ संस्थापक डॉ हेडगेवारांशी संपर्क झाला आणि जीवन संघमय झाले. १९३७ मध्ये मॅट्रिकच्या परिक्षेनंतर स्टेनोटायपिस्ट ची उत्तीर्ण झाल्यावर होशंगाबादला सरकारी नोकरीत रुजू झाले.
ज्या प्रमाणे वीर सावरकरांनी बालपणी मंदिरात देवीसमोर देशभक्तीची प्रतिज्ञा केली तशीच प्रतिज्ञा यादवरावजींनी अमरावतीतील जगदंबा मंदिरात रक्ताचा टिळा लावून घेतली. संघप्रचारक स्वरूपात त्यांनी ती प्रतिज्ञा पूर्ण केली. संघकार्यासाठी वडील , मोठे बंधू यांचा विरोध व रोष पत्करून सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन संघ प्रचारकी जीवनाची सुरवात केली.
सुरवातीला ग्राम प्रचारक, तालुका – जिल्हा – विभाग प्रचारक अशा जबाबदाऱ्या संघ कार्य त्या त्या भागात रुजवत सहज पणे पेलल्या. पुढे महाकोशल प्रांत प्रचारक म्हणून त्या कार्यरत राहिले.
त्यांचा सरळ स्वभाव, गोड व मृदू भाषा, प्रेमपूर्वक अंतःकरण व आत्मीयता, याचा त्यांचे संम्पर्कात आलेल्यांना लाभच झाला. एक यशस्वी प्रचारक बनण्यासाठी त्यांनी हे भांडवल जपले.
संघ कार्याच्या सुरवातीचे काळात संघ कार्य सर्वदूर नेण्यासाठी अनेक कार्यकर्ते व प्रचारक यांनी खडतर जीवन जगावे लागले. वहान उपलब्ध होणे सुद्धद कठीण होते, काही वेळेस सायकल सुध्दा. अशा वेळेस ३५ – ४० किमी प्रवास करणे, नदी नाले पार करणे अशा कठीण प्रसंगांना तोंड देत ठरलेल्या ठिकाणी , गावात , पोहोचणे , शाखा व संघ काम रुजवणे सहज पणे करीत.
१९४८ च्या संघ बंदी नंतरचा काळ हा आव्हानांचा होता. संघ विषयी जनतेमध्ये संभ्रम निर्माण झालेला होता. निराश जनक वातावरण झालेले होते. मानसिक व भावनिक प्रतिकूल स्थितीशी संघ कार्यकर्ते व प्रचारकांना झगडावे लागत होते. अशा परिस्थितीत मनाचा तोल ढळू न देता संघ कार्य हेच ईश्वरी कार्य समजून संघ प्रचारक व्रत पुढे पार पाडले . अशाच असंख्य कार्यकर्ते व प्रचारक यांच्या दृढ निश्चयावर, त्यागावर संघ आज शताब्दीकडे वाटचाल करीत आहे.
संघबंदी उठल्यावर यादवराव १९४९ – १९५४ या कालावधीत विलासपूर जिल्हा प्रचारक तर १९६७ पर्यंत विभाग प्रचारक म्हणून कार्यरत होते. विलासपूर भागात संघाचे कार्य रुजले, वाढले त्याचे पूर्ण श्रेय श्री यादवराव यांना जाते. १९६७ चे नंतर १९७४ पर्यंत जबलपूर विभाग प्रचारक दायित्व पार पाडले.
१९७५ मध्येआणीबाणी मुळे संघ कार्यकर्ते बंदिवासात गेले. तुरुंगात स्थानबद्ध असणाऱ्या स्वयंसेवकांच्या घरी संपर्क ठेवणे, भूमिगत राहून त्यांची देखभाल करणे, आर्थिक मदत पोहोचवणे , त्यासाठी प्रवास आखणी , पैशाची जमवा जमव, यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले.
आणिबाणी नंतर महाकोशाल प्रांत प्रचारक ही जबाबदारी त्यांनी अखेर पर्यंत पार पाडली. ६ फेब्रुवारी, १९८६ या दिवशी त्यांनी आपले जीवन पुष्प भारत मातेच्या चरणी घेतलेल्या प्रतिज्ञे प्रमाणे अर्पण केले.
१९४३ – १९८६ या ४२ वर्षाच्या प्रचारकी जीवन व्यतीत करताना कोठेही नावलौकिकाची ना चिंता व्यक्त केली ना पदाची अपेक्षा, प्रसिद्धीची लालसा तर दुरच . ना फोटो ( निधन नंतर त्यांच्या एका फोटोची आवश्यकता असताना स्थानिक कार्यकर्त्यांना फोटो मिळवणे एक आव्हानच होते. ) ना हार घालून घेतले. पुष्पहार घातला गेला तो त्यांचे पार्थिवावर.
|| तेरा वैभव अमर रहे माँ, हम दिन चार रहें ना ||
१९१६ : रा.स्व. संघाचे ज्येष्ठय प्रचारक श्री यादवराव कालकर यांचा जन्म ( मृत्यू : ६ फेब्रुवारी, १९८६ )
शंभू मित्रा – बंगाली रंगभूमीवरील प्रथितयश व प्रतिभावंत नट,दिग्दर्शक आणि नाटककार.
त्यांचा जन्म कलकत्ता येथे व शालेय शिक्षणही कलकत्ता येथील बालीगंज गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये झाले असून उच्च शिक्षणाची सुरुवात सेंट झेव्हियर्स कॉलेजमध्ये झाली पण शिक्षणात फारसा रस न वाटल्यामुळे त्यांनी शिक्षण अर्धवट सोडले आणि खाजगी रीत्या वाचन वाढवून स्वतःचे व्यक्तिमत्त्व स्वतः घडविले. १९३९ साली ते बंगाली रंगभूमीवर आले. प्रथम त्यांनी कलकत्त्यातील अनेक व्यावसायिक नाटकमंडळाबरोबर कामे केली. शिशिर भादुडी यांच्या अतिशय नावाजलेल्या नाटक कंपनीतही शंभू मित्र यांनी अभिनय केला होता.
पुढे १९४३ साली मात्र त्यांनी व्यावसायिक रंगभूमी सोडली व ते ‘इंडियन पिपल्स थिएटर असोसिएशन’ (आय् .पी.टी.ए.) चे सदस्य झाले. या काळात त्यांनी आपले नवान्न हे नाटक सादर केले होते. या नाटकाने तत्कालीन नाट्यजगतात एक नवेच चैतन्य आणले. १९४६साली त्यांनी आय्.पी.टी.ए.मधूनही आपले अंग काढून घेतले व स्वतःचा स्वतंत्र नाट्यसंच स्थापन केला. त्यालाच १९४८ साली ‘बहुरूपी’ असे नाव देण्यात आले होते. महर्षी मनोरंजन भट्टाचार्य हे या ‘बहुरूपी’ संस्थेचे अध्यक्ष होते.
शंभू मित्र यांची अभिनयासाठी व दिग्दर्शनासाठी गाजलेली काही नाटके अशी :रक्तकरबी (रवींद्रनाथ टागोर)दशचक्र (इब्सेन यांच्या ॲन एनिमी ऑफ द पीपलचे बंगाली रूपांतर)पुतुल खेला (इब्सेन यांच्या डॉल्स हाऊसचे बंगाली रूपांतर) विसर्जन (रवींद्रनाथ टागोर) राजा (रवींद्रनाथ टागोर) राजा ओयदिपाऊस (सोफोक्लीस यांच्या एडिपस रेक्सया नाटकाचे बंगाली भाषांतर)बाकी इतिहास (बादल सरकार) पागल घोडा (बादल सरकार) इत्यादी.
शंभू मित्र यांनी चित्रपटांचेही दिग्दर्शन केले असून त्यांच्या जागते रहो या हिंदी चित्रपटाला १९५६ साली कारलॉवी व्हारी या महोत्सवात उत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान लाभला होता. तसेच नाट्यदिग्दर्शक म्हणून १९५९ साली संगीत नाटक अकादेमी पुरस्कार आणि १९७० साली त्यांना भारत सरकारतर्फे ‘पद्मभूषण’ हा किताब देऊन गौरविण्यात आले होता, तर १९७६ साली त्यांना ‘मागसायसाय अवॉर्ड’ मिळाले होते. त्याचप्रमाणे १९८२ मध्ये त्यांना मध्य प्रदेश शासनाचा ‘कालिदास सन्मान’ (रु. एक लाख) देऊन गौरविण्यात आले होते.
अलीकडे काही वर्षे रवींद्र भारती विद्यापीठाच्या नाट्यविभागाचे विभाग-प्रमुख म्हणून त्यांनी काम सांभाळले असून त्यातून निवृत्त जीवनातही त्यांची अभिनयाची आवड कायमच असल्याचे दिसून येते. जर्मन दिग्दर्शक फ्रिट्स बेनेव्हिट्झ यांच्या दिग्दर्शनाखाली शंभू मित्र यांनी गॅलिलिओ जीवनी (ब्रेक्ट यांच्या गॅलिलिओचे बंगाली भाषांतर) या नाटकात केलेली गॅलिलिओची भूमिका म्हणजे त्यांच्या चिरनूतन अभिनयगुणांची साक्ष आहे.
शंभू मित्र यांची काही प्रकाशित पुस्तके अशी : अभिनय-नाटक–मंच (१९५७), पुतुल खेला (१९५८),कांचनरंग (१९६१),धुरणी(१९६७), राजा ओयदिपाऊस (१९६९),प्रसंग नाट्य (१९७२) इत्यादी.
नाट्याभ्यासाच्या निमित्ताने शंभू मित्र यांनी अमेरिका, रशिया, यूगोस्लाव्हिया, चेकोस्लोव्हाकिया, पोलंड,प. जर्मनी,पू. जर्मनी व कॅनडा इ. ठिकाणी प्रवास केला आहे.
१९९७: पद्मभूषण पुरस्कार सन्मानित बंगाली रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक व नाटककार शंभू मित्रा यांचे निधन. (जन्म: २२ ऑगस्ट , १९१५)
- घटना :
१५३६: इंग्लंडचा राजा आठवा हेन्री यांची बायको अॅन बोलेन हिचा व्यभिचाराबद्दल शिरच्छेद करण्यात आला.
१७४३: जीन पियरे क्रिस्टीन यांनी सेंटीग्रॅड तापमान पातळी विकसित केली.
१९१०: हॅले धुमकेतुचे शेपूट पृथ्वीला चाटुन गेले.
१९११: पार्कस कॅनडा ही जगातील पहिली राष्ट्रीय उद्यान सेवा सुरु झाली.
१९६३: द न्यू यॉर्क पोस्ट संडे मॅगझीनने डॉ. मार्टिन लूथर किंग जूनियर यांचे बर्मिंगहॅम जेलमधील पत्र प्रकाशित केले.
१९६५: मालागासी येथील तुई मलिला या वयोवृद्ध कासवाचा मृत्यू.
मृत्यू :
• १९०४: आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग समुहाचे संस्थापक जमशेदजी नसरवानजी टाटा यांचे निधन. (जन्म: ३ मार्च, १८३९)
• १९५८: औरंगजेबाचे पाच खंडात विस्तृत चरित्र लिहिणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहासकार सर यदुनाथ सरकार यांचे निधन. (जन्म: १० डिसेंबर ,१८७०)
• १९६९: इतिहास व पुराणसंशोधक पांडुरंग मार्तंड तथा आबा चांदोरकर यांचे निधन.
• १९९५: ग्वाल्हेर घराण्याचे संगीतज्ञ पद्मश्री पं. विनयचंद्र मौदगल्य यांचे निधन.
●१९९९: काव्य आणि संतवाङ्मयाचे गाढे अभ्यासक, कवी व समीक्षक प्रा. रमेश तेंडुलकर यांचे निधन. ( जन्म : १८ डिसेंबर, १९३० )
●२००८: नाटककार, चित्रपटकथालेखक, पत्रकार व साहित्यिक विजय तेंडुलकर यांचे निधन. (जन्म: ६ जानेवारी, १९२८)
२०२१ : मेळघाटातील लवादा येथील संपूर्ण बांबू केंद्राचे संस्थापक, वेणूपूत्र श्री. सुनील गुणवंतराव देशपांडे यांचे निधन.
- जन्म :
• १९०८: भारतीय लेखक, कवी आणि नाटककार माणिक बंदोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: ३ डिसेंबर , १९५६)
१९१०: नथुराम गोडसे यांचा जन्म. (देहदंड : १५ नोव्हेंबर १९४९)
१९२६: आध्यात्मिक गुरू आणि लेखक स्वामी क्रियानंद यांचा जन्म.
१९३४: भारतीय लेखक आणि कवी रस्किन बाँड यांचा जन्म.
१९३८: पद्मभूषण पुरस्कार सन्मानित तसेच ज्ञानपीठ पुरस्कार विजेते अभिनेते व दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांचा जन्म. (मृत्यू : १० जून ,२०१९),
१९६४: तामिळ अभिनेता मुरली यांचा जन्म. (मृत्यू: ८ सप्टेंबर २०१०)