एफआरपीची रक्कम वेळेत न दिल्यास कारवाई करा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

अंबड व घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांचे साखर सहसंचालकांना निवेदन

जालना : किमान आधारभूत किंमत एकरकमी न दिल्यामुळे अंबड व घनसावंगी तालुक्यातील संबंधित तीन कारखान्याना एकरकमी एफआरपी त्वरित देण्याबाबतचे आदेश द्यावेत, तसचे रक्कम वेळेत न दिल्यास या कारखान्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन नुकतेच शेतकरी व कामगार संघर्ष समीतीच्या वतीने साखर सहसंचालकांना देण्यात आले आहे.

दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि, वाहतूक रक्कम वजा करुन कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना यांची २७३७.६२ रुपये, सागर (समर्थ युनिट दोन) यांनी २८३२.६२ रुपये, समृध्दी शुगर लि. यांनी २९७०.०४ एवढी किमान आधारभुत किंमत होत असताना तिन्ही कारखान्यांनी गळीत हंगामात २०२४-२०२५ साठी पहिली उचल केवळ २५०० रुपये दिले.  हे अन्यायकारक आहे. २०२४-२०२५ च्या गळीत हंगाम बंद होऊन अनेक महिने झाले तरी वरिल कारखान्यांनी संपुर्ण (एफआरपी) अद्याप पर्यंत दिली नाही.

एफआरपीनुसार पैसे जमा करा; बैठकीत आदेश

अंबड घनसावंगी तालुक्यातील समर्थ, सागर आणि समृद्धी साखर सहकारी कारखान्याच्या शेतकऱ्यांना एफआरपी नुसार पैसे जमा करावे यासाठी साखर सह-संचालक रावल यांच्या सोबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. अंबड व घनसांवगी ऊस उत्पादक शेतकरी व कामगार संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »