‘किमान हमीभाव’वर गुरुवारी कार्यशाळा

पुणे : ‘किमान हमीभाव अनिवार्य कायदा आहे काय?’ या विषयावर गुरुवारी (१ डिसेंबर) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही कार्यशाळा पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात दुपारी १२ वाजता होणार आहे. एमएसपी गॅरंटी किसान मोर्चाने कार्यशाळेचे आयोजन केले आहे. मोर्चाचे अध्यक्ष व्ही. एम. सिंग यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन होईल. कार्यशाळेचे निमंत्रक माजी खासदार राजू शेट्टी यांनी ही माहिती दिली.
शेकाप नेते आ. जयंत पाटील, शेतकरी नेते रामपाल जाट, के. चंद्रशेखर, विश्वंभर चौधरी, इंद्रजित देशमुख, असीम सरोदे यांची कार्यशाळेला प्रमुख उपस्थिती आहे.
शेतकऱ्यांबद्दल आस्था असणाऱ्या कार्यकर्त्यांनी ही कार्यशाळा असल्याचे पत्रकात म्हटले आहे.