सहकारी साखर कारखान्यांसाठी स्वतंत्र बहुराज्यीय सोसायटी; उद्योगाच्या नव्या मॉडेलची तयारी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : देशातील सहकारी साखर उद्योग अधिक सक्षम करण्यासाठी स्वतंत्र बहुराज्यीय सहकारी सोसायटी स्थापन करण्याची प्रक्रिया केंद्र सरकारने सुरू केली आहे. पुण्यात झालेल्या बैठकीत केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली. या नव्या संस्थेमार्फत सहकारी कारखान्यांना आर्थिक, तांत्रिक, व्यवस्थापन आणि बाजारपेठेतील मदत उपलब्ध करून देण्याची योजना आहे.

साखर उद्योग आता केवळ साखर उत्पादनापुरता मर्यादित न राहता इथेनॉल, बायो-CNG, को-जनरेशन, हरित ऊर्जा आणि उपउत्पादन आधारित उद्योगांकडे वेगाने वळत आहे. अनेक कारखान्यांकडे विस्तारासाठी आवश्यक भांडवल नसल्याने BOT आणि BOOT मॉडेलवर प्रकल्प उभारण्यालाही चालना दिली जात आहे. नव्या बहुराज्यीय सोसायटीमुळे सहकारी कारखान्यांना तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि व्यवस्थापन कौशल्य मिळून ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »