…तर कारखान्याची निवडणूक लढवणार नाही : आ. राहुल कुल

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : कारखान्याच्या निवडणुकीसाठी कोणी सक्षम नेतृत्व पुढे आले तर मी थांबेन. मी निवडणूक लढवणार नाही, असे आमदार राहुल कुल यांनी भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यांच्या वार्षिक सभेत जाहीर केले.

भीमा पाटस साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल कुल व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे यांच्यात खडाजंगी झाली. त्यामुळे वातावरण काही काळ तापले गेले.

ही सभा कुल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी त्यांनी कारखाना चालू करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, कर्नाटकातील भाजपचे मंत्री मुर्गेश निराणी यांचे आभार मानले.

कार्यकारी संचालक आबासाहेब निबे यांनी विषय वाचन केले. विषय वाचन चालू असताना ताकवणे यांनी हरकत घेतली आणि ते बोलण्यासाठी उभे राहिले.

त्यावर कुल म्हणाले, विषय वाचन झाल्यावर सर्वांना बोलू दिले जाईल. हा मुद्दा ताकवणे व शेतकरी संघटनेचे राजेंद्र कदम यांना मान्य नव्हता. त्यावरून सभेत ‘तू तू मै मै’ झाले.

ताकवणे यांना उद्देशून कुल म्हणाले, “भीमा पाटस साखर कारखाना चालू करायला निराणी ग्रुपला १५० कोटी रूपये एकरकमी भरावे लागले. १५० कोटी रुपये देऊनही कारखान्यावर त्यांची मालकी नाही. १५० कोटीत दोन नवीन कारखाने उभे राहतात. १५० कोटी रूपये भाषणे ठोकून किंवा अर्ज करून मिळत नाहीत. हे लक्षात घ्या. हा कारखाना सुरू करण्यासाठी मी अनेकांचे पाय धरले. पैसा उभा केला आणि गाळप सुरू केले. अनेक ठिकाणी आपण पाहतो, कारखाने विकले जात आहेत किंवा लीजवर दिले जात आहेत. आपणहून हा कारखाना अनेक संकटांवर मात करत सुरू केला आहे. विकला नाही. तो सहकारीच राहील. जनतेच्या कारखान्याकडून असलेल्या पूर्ण करू. “

ताकवणे, तुम्ही कारखान्याला ऊस देत नाही, परंतु तुम्ही अडथळा आणला म्हणून कारखाना दीड महिना उशिराने सुरू झाला आहे. पुतणा मावशीचे प्रेम बंद करा. अध्यक्ष म्हणून कारखाना चालू करणे, ही माझी जबाबदारी होती. ती मी पार पाडली आहे, असेही कुल यांनी सुनावले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »