सीताराम महाराज कारखान्यात १९ पदांसाठी भरती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पंढरपूर : खर्डी येथील सीताराम महाराज साखर कारखाना लिमिटेडमध्ये अभियांत्रिकी विभागातील विविध १९ पदांसाठी पात्र आणि अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन ५ हजार मेट्रिक टन असून, येथे १८ मेगावॉट क्षमतेचा सहवीज निर्मिती प्रकल्प आणि ११० केएलपीडी क्षमतेचा डिस्टिलरी प्रकल्प कार्यरत आहे. या प्रकल्पांसाठी क्रेन ऑपरेटरची ११ पदे, फिडिंग टेबल ऑपरेटरची ३ पदे, टिपलर ऑपरेटरची ३ पदे आणि मिल ऑईलमनची २ पदे भरली जाणार आहेत.

क्रेन ऑपरेटर आणि फिडिंग टेबल ऑपरेटर पदासाठी दहावी, बारावी किंवा आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. टिपलर ऑपरेटर व मिल ऑईलमन पदासाठी दहावी किंवा बारावी उत्तीर्ण उमेदवार पात्र असतील. सर्व पदांसाठी संबंधित कामाचा तीन ते पाच वर्षांचा अनुभव अपेक्षित आहे.

इच्छुक उमेदवारांनी आपला संपूर्ण अनुभव, शैक्षणिक पात्रता, सध्याचा व अपेक्षित पगार, पत्ता आणि संपर्क क्रमांकासह बायोडाटा घेऊन खर्डी येथील कारखाना कार्यालयात प्रत्यक्ष भेट द्यावी. अधिक माहितीसाठी hr.smskl@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधता येईल.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »